Sunrisers Hyderabad Defeat Mumbai Indians
Sunrisers Hyderabad Defeat Mumbai Indians  esakal
IPL

SRH vs MI : हैदराबादच्या 'सुमार दर्जाच्या' खेळपट्टीवर गोलंदाजांच आभाळ फाटलं

अनिरुद्ध संकपाळ

Sunrisers Hyderabad Defeat Mumbai Indians : एका टी 20 सामन्यात तब्बल 523 धावा झाल्याचं कधी ऐकलं होतं का....? हा अविश्वसनीय प्रकार हैदराबाद अन् मुंबईच्या सामन्यात झाला! टी 20 इतिहासातल्या सर्वाधिक 38 षटकार याच सामन्यात मारले गेले. टी 20 इतिहासातल्या एकूण सर्वाधिक धावा याच सामन्यात झाल्यात!

या सामन्याचं एका वाक्यात वर्णन करायचं तर बॅटिंग विरूद्ध बॅटिंग! हैदराबादच्या एकाही फलंदाजानं शतक ठोकलं नाही तरी त्यांनी आयपीएल इतिहासामधील सर्वाधिक 277 धावा ठोकल्या. मुंबईकडून फक्त एका फलंदाजानं अर्धशतक ठोकलं तरी 20 षटकात झाल्या तब्बल 246 धावा!

या सामन्यातील गोलंदाज आणि गोलंदाजीची चर्चा करण्यात काही अर्थच नाही! दोन्ही संघातील गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला! याचा अर्थ खेळपट्टी पाटा नव्हती तर 'क्रिकेट' खेळण्याच्या लायकीचीच नव्हती! तरी जाता जाता उल्लेख करावा यासाठी सांगतो की दोन्ही संघाकडून प्रत्येकी एका गोलंदाजानं आपली इकॉनॉमी 10 च्या आत ठेवत गोलंदाजी केलीये. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं 4 षटकात 9 च्या इकॉनॉमीनं 36 धावा दिल्या मात्र त्याची विकेटची पाटी कोरीच राहिली. दुसरीकडं हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं 4 षटकात 8.80 च्या इकॉनॉमीनं 35 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्यानं तिलक वर्मा अन् रोहित शर्माची शिकार केली.

मात्र कमिन्सला अन् त्याच्या गोलंदाजीला कोण विचारतंय...? सामन्यात धावांचा अन् षटकारांचा पाऊस इतका धुवाँधार होता की त्यात हे सगळं धुवून गेलंय. खरा मॅचविनर तर कमिन्सच आहे. मात्र पाटा खेळपट्टीवरच्या रेकॉर्ड ब्रेक धावांच्या सामन्यात फलंदाजच स्टार असणार आणि आम्हाला याचा आनंदच होणार! जाणकारांनी हैदराबादच्या अभिषेक शर्माला मॅन ऑफ द मॅच निवडलंय.

मात्र सामन्यात कमिन्सनंतर कोणी मोठा फरक निर्माण केला असेल तर तो आहे हेन्री क्लासेन! सामन्यात दोन्ही संघांकडून जवळपास तीन फलंदाजांनी 60 ते 65 या दरम्यान धावा केल्या. काहींनी 23-30 तर काही चाळीशीत गेले. मात्र क्लासेननं मात्र 34 चेंडूत नाबाद 80 धावा ठोकून मोठी खेळी केली. याच अधिकच्या 30-40 धावा मुंबईवर भारी पडल्या. मुंबईचा पराभव फक्त 31 धावांनीच झालाय.

आयपीएल 2024 मधला 27 मार्चचा हा हैदराबाद-मुंबई सामना आयपीएलच्या, टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. या सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला गेलाय. सामन्यातील सर्वाधिक षटकारांचा नियम देखील मोडला गेलाय. मात्र खरंच या सामन्यात क्रिकेट जिंकलं....? जर तुम्हाला वाटत असेल या सामन्यात तुम्ही दर्जेदार क्रिकेट पाहिलं आहे तर सांगा तुम्हाला आवडलेला सर्वात चांगला चेंडू कोणता?

(IPL Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ''कोण येतंय कोण नाही, याच्यावर आमचं लक्ष'' मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

India Head Coach : मुहूर्त ठरला तर मग.... गौतम गंभीर 'या' दिवशी सांभाळणार टीम इंडियाच्या कोचचा पदभार, BCCI करणार घोषणा

Latest Marathi News Live Update : जयदत्त क्षीरसागरांच्या मेळाव्याला संदीप क्षीरसागरांच्या वडिलांची उपस्थिती

ChatGPT-5 : OpenAIची मोठी घोषणा! लवकरच तुमच्या भेटीला येतंय ChatGPT-5, जाणून घ्या लाँच अपडेट आणि भन्नाट फीचर्स

एसटी महामंडळाची ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ विशेष मोहीम! विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एसटी बसचा पास; बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत पास

SCROLL FOR NEXT