Suresh Raina One decision in 2020 IPL Season ends his Chennai Super Kings Long journey
Suresh Raina One decision in 2020 IPL Season ends his Chennai Super Kings Long journey  esakal
IPL

BLOG: 'त्या' घटनेनंतर सुरेश रैनाचा CSK मधून पत्ता झाला कट?

अनिरुद्ध संकपाळ

दोन दिवस चाललेल्या आयपीएल लिलाव 2022 मध्ये (IPL 2022 Auction) एक मोठा बदल झाला. हा बदल 4 आयपीएल टायटल आपल्या नावावर करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) बाबत झाला. सीएसकेमधूनच मिस्टर आयपीएल (Mister IPL) म्हणून नाम कमावलेल्या सुरेश रैनासाठी (Suresh Raina) एकही संघाने बोली लावली नाही. विशेष म्हणजे मिशन 'घरवापसी' घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जने देखील सुरैश रैनाला भाव दिला नाही. यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेला सुरेश रैना पहिल्यांदाच आयपीएल खेळताना दिसणार नाही.

धोनीबरोबरचा याराना नाही आला कामी

ज्या सुरेश रैनाने आपला भाऊ म्हणजे महेंद्रसिंह धोनीबरोबरच 15 ऑगस्ट 2020 ला निवृत्ती घेतली. ज्या धोनीशिवाय सुरैश रैनाचे (Suresh Raina Friendship With MS Dhoni) पान हलत नव्हते. त्याच सुरेश रैनावर धोनी असताना आयपीएल लिलावात अनसोल्डचा (Unsold) शिक्का बसला. रैनाला सीएसकेने (CSK) बाजूला केल्यानंतर त्याच्यासाठी त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मोहिमच उघडली. अनेकांनी तर धोनीसकट सीएसकेच्या मालकांवर टीका केली. एका मुलाखतीत सुरैश रैना म्हणाला होता की, जर माही भाई पुढच्या हंगामात खेळणार नाही तर मी देखील खेळणार नाही.' इतका याराना देखील सुरैश रैनाच्या कामी आला नाही.

रैनाचा एक निर्णय आणि सीएसकेने केला चॅप्टर क्लोज

सुरैश रैना आणि सीएसके मधील फाटाफूट ही यंदाच्या लिलावात झालेली नाही. त्यांच्यात फाटाफूट होण्याची कारण एक घटना आहे. 2020 चा आयपीएल हंगाम (IPL 2020 Season) हा युएईमध्ये सुरू होणार होता. मात्र स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जमधील 13 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाले. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड देखील पॉझिटिव्ह होते. यानंतर काही दिवसातच सुरैश रैनाने स्पर्धेतून माघार घेतली. त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की रैनाला धोनीसारखीच रूम हवी होती. धोनीच्या रूमला बाल्कनी होती. यावरून रैनाचा आणि संघ व्यवस्थापनाचा वाद झाला आणि रैनाने आयपीएलमधून माघार घेतली.

याबाबत सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांनी देखील प्रतिक्रिया दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. ते म्हणाले होते की, 'जर तुम्ही एकाच गोष्टीवर अडून बसला आहात किंवा तुम्ही आनंदी नसाल तर तुम्ही परत जा. मी कोणालाही काहीही करण्याची सक्ती केलेली नाही. काहीवेळा यश तुमच्या डोक्यात जाते.' इथेच रैनाचा सीएसके चॅप्टर क्लोज झाला होता. मात्र ज्यावेळी संघातील वाद चव्हाट्यावर येऊ लागला त्यावेळी सुरेश रैनाने आपण वैयक्तिक कारणाने आयपीएलमधून माघार घेत आहोत असे सांगितले.

मोईन अलीला रिटेन करून दिला संकेत

धोनीच्या मध्यस्थीने सुरेश रैना पुढच्या हंगामात सीएसकेकडून खेळला. मात्र ज्यावेळी सीएसकेने खेळाडू रिटेन करताना मोईन अलीला (Moeen Ali) रिटेन केले त्याचवेळी त्यांनी सुरेश रैनाची रिप्लेसमेंट शोधल्याचे संकेत दिले. त्याचवेळी सुरेश रैनाचा सीएसकेमधून पत्ता कट झाला होता. कारण, जर सुरेश रैना आणि सीएसके संघ व्यवस्थापनात सर्व काही आलबेल असते तर त्यांनी सुरेश रैनासाठी नक्कीच बोली लागवली असती. यंदाच्या आयपीएल (IPL 2022 Auction) हंगामात सीएसकेने आपल्या जुन्या सर्व खेळाडूंना परत संघात घेण्याचा जोरदार प्रयत्न केला.

सीएसकेसाठी (CSK) विश्वास हा मोठा फॅक्टर आहे. हे त्यांनी आपल्या रिटेंशन आणि लिलावातून दाखवून दिले आहे. जे खेळाडू त्यांच्या संघाप्रती कृतज्ञ आहेत संघ त्यांची साथ कधीही सोडत नाही. यंदाच्या लिलावात काही त्यांच्या हातून निसटून गेले. याबद्दल त्यांनी जाहीर दुःख देखील व्यक्त केले. अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पा यासारख्या कारकिर्द संपलेल्या खेळाडूंना संघात परत आणले. रैना फिटनेसच्या बाबतीत यांच्यापेक्षा कितीतरी उजवा आहे. तरी सीएसकेने त्याच्यासाठी आपला दरवाजा बंदच ठेवला.

रैना सीएसके वादात कोण बरोबर कोण चुकीचे? 2020 च्या आपयपीएलमधून माघार घेणे बरोबर होते का? हे सीएसके आणि रैना दोघांनाच माहिती. मात्र तो एक आव्हानात्मक काळ होता. त्यावेळी काही आव्हानात्मक निर्णय घेतले गेले. सीएसकेने पडत्या काळात कोण कसे वागले हे ध्यानात ठेवले. रैना बाल्कनीसाठी अडला होता की नाही हे तो आणि संघ व्यवस्थापनच सांगू शकतो. मात्र इथे एक उदाहरण नक्की लक्षात ठेवण्यासारखे आहे. धोनीचा बॅटिंग फॉर्म चांगला नाही. तरी थलायवाला सीएसकेने रिटेन केले. धोनीनेही आपल्यापेक्षा रविंद्र जडेजाला संघाची पहिली पसंती देण्याचा आग्रह धरला. संघ आणि खेळाडूमधील नात्याचे हे आदर्श उदाहरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT