Suresh Raina Pushpa Style Post Viral  esakal
IPL

अनसोल्ड रैनाची पोस्ट, कोणाला म्हणतोय 'फायर हैं मैं'

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 लिलावात (IPL 2022 Auction) मिस्टर आयपीएल सुरेश रैनावर (Suresh Raina) अनसोल्ड राहण्याची वेळ आली होती. आयपीएलमध्ये 5000 च्या वर धावा करणाऱ्या सुरेश रैनाला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. त्याने लिलावात आपली बेस प्राईस 2 कोटी ठेवली होती. विशेष म्हणजे 12 वर्षे चेन्नईकडून (CSK) खेळलेल्या सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग्जने देखील खरेदी केले नाही. मात्र रैनाने याबाबत सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

मात्र आता त्याने आपला एक फोटो ट्विटवर शेअर केला आहे. या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत. विशेष म्हणजे सुरेश रैनाने या फोटोला एक खास कॅप्शनही दिले आहे. त्याने फायरचा इमोजी शेअर करत तुम्हाला माहिती आहे ना असे कॅप्शन दिले आहे. त्याचा फोटो हा पुष्पा चित्रपटातील आयकॉनिक स्टाईलचा (Pushpa Style) आहे.

रैनाने पुष्पा स्टाईलमध्ये शेअर केलेल्या फोटोला त्याचे फॅन्स चांगली प्रतिक्रिया देत आहेत. तो या फोटोतून जरी मी आयपीएल लिलावात (TATA IPL Auction) अनसोल्ड (Unsold) राहिलो असलो तरी 'मैं झुकेगा नाहीं' असा संदेश देतोय. सुरेश रैना येणाऱ्या काळात क्रिकेट खेळत राहणार आहे.

सुरेश रैनाला आयपीएल रिटेंशन दरम्यान, सीएसकेने रिटे केले नव्हते. त्यानंतर लिलावात देखील त्याला खरेदी करण्यात आले नाही. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जवर त्याचे चाहते चांगलेच भडकले होते. सोशल मीडियावर सुरेश रैना ट्रेंडिंगवर होता. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 205 सामने खेळले आहेत. त्यात 5528 धावा केल्या आहेत. आयपीएल इतिहासात सर्वात पहिल्यांदा 5000 धावांचा टप्पा पार करणारा सुरेश रैना हा पहिला खेळाडू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT