suresh raina return to csk next season  
IPL

CSK च्या ताफ्यात 'मिस्टर IPLची' होणार पुन्हा एन्ट्री, ट्विट चर्चेत

चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात सुरेश रैनाला कायम ठेवले नव्हते.

Kiran Mahanavar

Suresh Raina:आयपीएल 2022 चे विजेतेपद गुजरात टायटन्सने जिंकले, तर चेन्नई सुपर किंग्ज या हंगामात प्लेऑफमध्येही पोहोचू शकले नाहीत. 10 संघांमध्ये चेन्नई 9 व्या स्थानावर होती. चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात सुरेश रैनाला कायम ठेवले नव्हते. त्यानंतर त्याला मेगा लिलावात पण चेन्नई घेतला नाही. सुरेश रैनाला कोणत्याही संघाने लिलावात बोली लावली नव्हती आणि तो या हंगामात विकला गेला नाही. (Suresh Raina Return To CSK Next Season IPL)

आयपीएल 2022 मध्ये सुरेश रैना कॉमेंट्री करताना दिसला. चेन्नई सुपर किंग्जला 30 मे रोजी रैनाच्या जुन्या खेळी आठवल्या. त्यानंतर सुरेश रैना ज्या प्रकारे ट्विटला उत्तर दिलं, त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता आहे की तो पुढच्या हंगामासाठी CSK मध्ये परत येत आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आयपीएल 2014 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रैनाने 25 चेंडूत 87 धावा केल्या होत्या. रैनाने त्या सामन्यात 12 चौकार आणि सहा षटकार मारले होते. मात्र सीएसकेने तो सामना हारला.

रैनाच्या या खेळीबद्दल सीएसकेने ट्विट केले. ज्यावर रैनाने शेअर इमोजी मधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्यामध्ये तो सीएसकेला कॉल करावा असे सूचित करत आहे. या ट्विटनंतर चाहत्यांकडून अंदाज लावला जात आहे की, पुढच्या हंगामासाठी रैना पुन्हा CSK संघात परत येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT