Suryakumar Yadav MI vs RCB esakal
IPL

Suryakumar Yadav MI vs RCB : मुंबई पोहचली तिसऱ्या स्थानावर, आरसीबीचं वाढलं टेन्शन

अनिरुद्ध संकपाळ

Suryakumar Yadav MI vs RCB : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पहिल्या षटकापासूनच आपली धावांची सरासरी 10 धावा प्रति षटकाच्या आसपास ठेवली होती. त्यामुळे मुंबईने आरसीबीने 200 धावांचे आव्हान 17 व्या षटकातच पार केले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी केली. त्याने 237.14 च्या स्ट्राईक रेटने धावा करत मुंबईला महत्वाच्या सामन्यात विजय मिळवून दिला. त्याला नेहल वधेराने 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली.

मुंबईने आरसीबीच्या महत्वाच्या फलंदाजांचे झेल सोडल्यामुळे आरसीबीला 200 धावांच्या जवळ पोहचण्याची संधी मिळाली. त्यामुळे रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला जवळपास 10 च्या सरासरीने धावा करणे गरजेचे होते. सलामीवीर इशान किशनने दमदार सुरूवात करत रोहित शर्माचे टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी 5 व्या षटकात अर्धशतकी सलामी दिली.

मात्र इशान 21 चेंडूत 42 धावा चोपणारा इशान किशन हसरंगाच्या फिरकीत फसला. त्यानंतर रोहित शर्मा देखील 7 धावा करून हसरंगाचा बळी ठरला. मात्र यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि नेहल वधेरा यांनी आक्रमकपणे मुंबईची सरासरी 10 धावा प्रती षटक ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

या दोघांनी 10 व्या षटकात मुंबईला शतकी मजल मारून दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फलंदाजी करत धावांची गती अधिक वाढवली. त्याने वधेरासोबत तिसऱ्या विकेटसाठी 10.4 षटकात 140 धावांची भागीदारी रचली. सूर्याने 35 चेंडूत 84 धावा चोपल्या. त्याने 237.14 च्या स्ट्राईक रेटने धावा करत मुंबईला 16 व्या षटकातच 192 धावांपर्यंत पोहचवले.

आता फक्त विजयाची औपचारिकता शिल्लक असताना सूर्या बाद झाला. यानंतर आलेला टीम डेव्हिड देखील शुन्यावर बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजूने भक्कमपणे फलंदाजी करणाऱ्या नेहल वधेराने 35 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईने हा सामना जिंकत 12 गुणांची कमाई केली. ते आता गुणतालिकेत थेट तिसऱ्या स्थानावर पोहचले. आरसीबीच्या या पराभवामुळे आता जरी आरसीबीने इथून पुढचे सर्व सामने जिंकले तरी त्यांचे 16 गुण होणार आहेत. त्यामुळे त्यांना जर तरच्या गणितावर अवलंबून राहवे लागण्याची दाट शक्यता आहे.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगलोरने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान उभे केले. मुंबईच्या बेहरनडॉर्फच्या भेदक माऱ्यासमोरही ग्रेन मॅक्सवेल (66) आणि फाफ ड्युप्लेसिस (65) यांनी झंजावाती 120 धावांची भागीदारी रचली. दिनेश कार्तिकने स्लॉग ओव्हरमध्ये 17 चेंडूत 30 धावा करत आरसीबीला 200 धावांच्या जवळ पोहचवले. मुंबईकडून जेसन बेहरनडॉर्फने चांगला मारा करत 36 धावात 3 बळी टिपले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT