Sunil Narine on T20 World Cup 2024 News Marathi sakal
IPL

Sunil Narine : 'मी वर्ल्डकप खेळणार नाही...' IPL मध्ये तांडव घालणाऱ्या खेळाडूच्या पोस्टने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

Sunil Narine on T20 World Cup 2024 : या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू सुनील नरेनने आगामी टी-20 वर्ल्ड कप न खेळण्याची घोषणा केली आहे.

Kiran Mahanavar

Sunil Narine on T20 World Cup 2024 : या आयपीएलमध्ये सुनील नरेन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केकेआरकडून खेळणारा हा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. मोठी गोष्ट म्हणजे सुनील नरेन या हंगामात बॉलपेक्षा आतापर्यंत बॅटने जास्त कहर करत आहे.

आयपीएलची कामगिरी पाहता तो 2024 चा टी-20 वर्ल्ड कप खेळणार याच्या चर्चेला वेग आला आहे. पण वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू सुनील नरेनने आगामी टी-20 वर्ल्ड कप न खेळण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून सुनील नारायणने ही माहिती दिली.

सुनील नरेनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे असताल. माझ्या नुकत्याच झालेल्या कामगिरीनंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेन आणि वेस्ट इंडिजकडून टी-20 वर्ल्ड कप खेळेन, असा विश्वास अनेकांना वाटत आहे. पण असे नाही, मी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नाही, टी-20 वर्ल्ड कपमध्ये मी वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणार नाही.

सुनील नरेन पुढे लिहितात की, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना शुभेच्छा, मला वेस्ट इंडिजने टूर्नामेंट जिंकताना पाहायचे आहे. अलीकडच्या काळात मेहनत घेतलेल्या खेळाडूंना वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळावी, वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा टी-२० विश्वचषक चॅम्पियन व्हावे, अशी माझी इच्छा आहे...

आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर सुनील नारायण टी-20 वर्ल्ड कप खेळताना दिसणार असे मानले जात होते. पण आता खुद्द सुनील नरेननेच या अटकळांचे खंडन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT