T20 World Cup 2024 Team India Squad esakal
IPL

T20 World Cup 2024 : जर सात फलंदाज WC जिंकून देऊ शकत नाही तर... भारतीय संघनिवडीपूर्वी सिद्धूनं दिला द्रविडला मोलाचा सल्ला

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2024 Navjot Singh Sidhu Advice : वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी संघ निवडीची मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भारतीय निवडसमिती आणि संघ व्यवस्थापन संघ निवडीची तयारी करत आहेत. दरम्यान, भारताचे माजी फलंदाज आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमितीला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

सिद्धू यांनी द्रविड आणि निवडसमितीला गुणवत्तापूर्ण गोलंदाजांबाबत कोणतीही तडजोड करून नये असा सल्ला दिला. जर संघाने तडजोड केली आणि एक अतिरिक्त फलंदाज संघात निवडला तर आपल्याला वर्ल्डकपमध्ये मोठी निराशा हाती लागू शकते असं मत सिद्धू यांनी मांडले.

सिद्धू यांनी दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि जसप्रीत बुमराहसाठी जोरदार बॅटिंग केली. स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात बोलताना सिद्धू म्हणाले की, 'मी राहुल द्रविडला थेट सल्ला देईन की जर तुम्हाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर तुमच्याकडे पाच विकेट घेणारे स्पशलिस्ट गोलंदाज हवेत. जर यात तडजोड केली तर संघ घसरणीला लागेल.'

सिद्धू यांनी वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात कोणते गोलंदाज हवेत याबद्दल आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, फिरकीपटू म्हणून तुमच्याकडे बिश्नोई, कुलदीप आणि जडेजा असतील. वेगवान गोलंदाजांमध्ये जर मयांक यादव फिट असेल तर तो संघात येईल. खलील अहमद, मुकेश कुमार, मोहसीन खान हे वेगवान गोलंदाज हवेत.'

सिद्धू पुढे म्हणाले की, 'भारताकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी कोणतीही तडजोड करू नये. त्यांनी थोडी गोलंदाजी आणि थोडी फलंदाजी करू शकणारे खेळाडू निवडू नयेत. तुम्ही सर्व वर्ल्डकप विजेत्या संघाच्या कर्णधाराबद्दल विचार करा. ते सर्व चांगल्या बॉलिंग ऑप्शनसह खेळले होते. हेच तर रहस्य असतं. जर सात फलंदाज तुम्हाला वर्ल्डकप जिंकून देऊ शकत नसतील तर आठ तरी वर्ल्डकप कसे जिंकून देतील.'

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT