Team India Squad T20 World Cup 2024 Rishabh Pant News Marathi sakal
IPL

Team India Squad T20 WC24 : राजधानीत वादळ! 8 षटकार 5 चौकाराचा कमाल, टी-20 वर्ल्ड कपसाठी 'या' खेळाडूचे अमेरिकेचे तिकीट बुक

Team India Squad T20 World Cup 2024 : बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा 4 धावांनी पराभव केला.

Kiran Mahanavar

Team India Squad T20 World Cup 2024 Rishabh Pant : बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा 4 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सच्या या विजयात त्याचा कर्णधार ऋषभ पंतचा मोठा वाटा होता.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऋषभ पंतच्या धमाकेदार फलंदाजीचा झंझावात पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात ऋषभ पंतने कर्णधारपदाची खेळी खेळताना झंझावाती खेळी करताना 43 चेंडूत 88 धावा केल्या. ऋषभ पंतने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 8 षटकार मारले. आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी दावेदारी ठोकली.

राजधानीत ऋषभ पंतचे वादळ...!

ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात 88 धावांची नाबाद खेळी खेळण्यासोबतच ऋषभ पंतने विकेटच्या मागे 2 शानदार झेलही घेतले. ऋषभ पंतला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' म्हणूनही निवडण्यात आले.

या सामन्यात ऋषभ पंतने एका दगडात दोन पक्षी मारले. एक म्हणजे ऋषभ पंतने केवळ दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. आणि दुसरी म्हणजे टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत निवडीसाठी आपला दावाही मजबूत केला आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या भूमीवर 2024 टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. आयसीसीचा हा मेगा इव्हेंट 1 जून ते 29 जून दरम्यान खेळला जाणार आहे.

डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण कार अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ पंतने आयपीएल 2024 मध्ये करिष्माई पुनरागमन केले. ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्ये त्याच जुन्या टचमध्ये दिसत आहे. तो या हंगामात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आहे. ऋषभ पंतने आतापर्यंत आयपीएल 2024 च्या नऊ सामन्यांमध्ये 161.32 च्या स्ट्राइक रेटने 342 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने आयपीएल 2024 मध्ये 3 अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : दिल्ली जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर, मुंबई चौथ्या क्रमांकावर; श्वास घेणेही झाले कठीण, अहवालाने चिंता वाढवली

PKL 12: यु मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स संघांवर कोसळला दुःखाचा डोंगर! युवा सदस्स्यांच्या निधनाने प्रो कबड्डीमध्ये शोककळा

Crime: धक्कादायक! उपचारासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीसोबत संतापजनक कृत्य, मुलीनं सांगितली आपबिती, क्रूर डॉक्टर अटकेत

Latest Marathi News Live Update : अकोल्यातल्या गांधी रोडवर रविकांत तुपकर यांच्या शेतकरी संघटनेने 'काळी दिवाळी' साजरी केली

मोहसिन नक्वी सुधर, नाहीतर...! Asia Cup Trophy वरून बीसीसीआय आक्रमक; पाकिस्तानी नेत्याला दिला इशारा...

SCROLL FOR NEXT