Tanush Kotian | Rajasthan Royals X/rajasthanroyals
IPL

IPL 2024, Video : खेळ मांडला...! राजस्थानमध्ये सामील होताच मराठमोळ्या तनुषचा वडिलांना व्हिडिओ कॉल

Tanush Kotian: आयपीएल 2024 ला सुरू होण्यास काही तास बाकी असतानाच राजस्थान रॉयल्स संघात निवड झाल्यानंतर तनुष कोटीयनने वडिलांना कॉल केला होता, त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Rajasthan Royals News: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) स्पर्धेला शुक्रवारी (22 मार्च) सुरुवात झाली. या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या अगदी काही तास आधी राजस्थान रॉयल्स संघात मुंबईच्या तनुष कोटियनची निवड झाल्याची घोषणा झाली.

तनुषला फिरकीपटू ऍडम झाम्पाच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी दोनच दिवस राहिले असताना झाम्पाने अचानक माघार घेतली.

झाम्पाला आयपीएल 2024 हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने संघात कायम केले होते. परंतु, त्याने वैयक्तिक कारणाने या हंगामातून माघार घेतली आहे.

झाम्पा 2023 वर्ल्डकपपासून सातत्याने ऑस्ट्रेलियाकडून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे. पण आता त्याने आयपीएलच्या 17 व्या हंगामातून माघार घेतल्याने त्याच्या जागेवर तनुषची राजस्थान रॉयल्सने संघात निवड केली. राजस्थानने तनुषला 20 लाखांच्या किमतीत संघात सामील करून घेतले.

त्याच्या निवडीनंतर राजस्थान रॉयल्सने त्याचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तो त्याच्या वडिलांशी बोलताना दिसत आहे. त्याने वडिलांना व्हिडिओ कॉल केलेला दिसत असून यावेळी त्याने राजस्थान रॉयल्सची जर्सी घातलेली आहे.

या व्हिडिओ कॉलवर तनुष आणि त्याच्या वडिलांमध्ये मराठीत संभाषण झाले. त्याचे वडील त्याला राजस्थान रॉयल्सच्या जर्सीतील फोटो पाठव असंही सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला राजस्थान रॉयल्सने 'खेळ मांडला' हे गाणे वाजत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्याप्रमाणात पसंती मिळाली आहे.

तनुष कोटियनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी शानदार कामगिरी केली आहे. त्याने सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेत चांगली कामगिरी केली. तो रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामातील सर्वोत्तम खेळाडूही ठरला. त्याने या हंगामात 502 धावा आणि 29 विकेट्सही घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT