team india-cheteshwar-pujara-no-price-in-ipl-auction-captain-foreign-team-sussex-century-county-debut county-cricket wtc news in marathi kgm00 
IPL

Cheteshwar Pujara : WTC फायनलचा घोर मिटला! पुजाराने ठोकेल इंग्लंडमध्ये झुंजार शतक

भारतीय दिग्गज खेळाडूला IPL मध्ये नाही मिळाली संधी! अन् आता ...

Kiran Mahanavar

Cheteshwar Pujara : इंडियन प्रीमियर लीगचा 16वा हंगाम भारतातील विविध शहरांमध्ये खेळला जात आहे. या लीगमध्ये 10 संघ सहभागी आहेत. या स्पर्धेतून एक भारतीय अनुभवी खेळाडू गायब असून तो परदेशी भूमीवर खेळत आहे. केवळ खेळत नाही तर आपल्या संघाचे नेतृत्वही करत आहे. याच दिग्गज खेळाडूने शतक झळकावून मैदानावर दहशत निर्माण केली. तो म्हणजे चेतेश्वर पुजारा.

पुजारा कौंटी संघाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने परदेशी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता त्याने कर्णधारपदावर पदार्पण केले आहे. ससेक्स संघाकडून अप्रतिम खेळ दाखवताना पुजाराने शतक झळकावले.

चेतेश्वर पुजाराने या मोसमात ससेक्सचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच सामन्यात डरहमविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. पुजाराने दुसऱ्या दिवशी 163 चेंडूत 115 धावा केल्या. या खेळीत त्याने 13 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने ऑलिव्हर कार्टर (41) सोबत पाचव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली.

ससेक्सने याआधी डरहमला 376 धावांवर बाद केले पण 91 धावांत चार बाद झाले. येथून पुजाराने कर्णधारपदाची खेळी खेळत डरहमची आघाडी कमी केली. त्याला बेन रेनने एलबीडब्ल्यू आऊट केले. जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पुजारा भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे.

त्याआधी तो आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. पुजाराने गेल्या मोसमात ससेक्ससाठी शानदार फलंदाजी करत आठ सामन्यांत पाच शतकांच्या मदतीने 1094 धावा केल्या. कौंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

Yavatmal Healthcare: १०२ वर वारंवार फोन, तरी रुग्णवाहिका आली नाही; राळेगावात जंगलातच महिलेची प्रसूती

Marathi News Live Updates : लोहगावमध्ये रस्त्यावरील खड्ड्याला चक्क चिकटपट्टी लावून पुणेकराचे अनोखे आंदोलन, महापालिकेच्या कारभाराचा जाहीर निषेध

दीड तासांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! वर्सोवा केबल-स्टेड पुलास हिरवा कंदील, २१ किमीचे अंतर अवघ्या दीड किमीवर

SCROLL FOR NEXT