IPL 2024 CSK vs LSG sakal
IPL

IPL 2024 CSK vs LSG : लखनौसमोर चेन्नईचे आव्हान ; शिवम दुबे-रवी बिश्‍नोईमधील द्वंद्वाची उत्सुकता शिगेला

लखनौ सुपरजायंटस्‌ व चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये उद्या आयपीएल साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. मागील दोन लढतींमध्ये लखनौला पराभवाचा सामना करावा लागला असून चेन्नईने मागील दोन लढतींमध्ये विजय साकारले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : लखनौ सुपरजायंटस्‌ व चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये उद्या आयपीएल साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. मागील दोन लढतींमध्ये लखनौला पराभवाचा सामना करावा लागला असून चेन्नईने मागील दोन लढतींमध्ये विजय साकारले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

मथिशा पथिराना, मुस्तफिजूर रहमान, रवींद्र जडेजा, माहीश तीक्षणा या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावण्याचे काम यजमान संघ लखनौला करावे लागणार आहे. चेन्नईचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज शिवम दुबे व लखनौचा फिरकी गोलंदाज रवी बिश्‍नोई यांच्यामधील लढत आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे.

लखनौसाठी निकोलस पूरन (२२३ धावा), कर्णधार के. एल. राहुल (२०४ धावा) यांनी धावा उभारल्या आहेत. पूरन याने १६१.५९ च्या सरासरीने धावांची फटकेबाजी केली आहे. तसेच १९ षटकारांचा पाऊसही त्याने पाडला आहे. त्याच्याकडून यापुढेही हीच अपेक्षा असेल, पण राहुलकडून मोठ्या खेळीची आशा असणार आहे. क्विंटोन डी कॉक याने दोन अर्धशतकी साकारल्या, पण त्यानंतर त्याला ठसा उमटवता आलेला नाही.

आयुष बदोनीने एक अर्धशतकासह ११३ धावा केल्या आहेत, पण त्याच्याकडून सामन्याला कलाटणी देणारी खेळी झालेली नाही. मार्कस स्टॉयनिस याला सहा सामन्यांमधून फक्त १२२ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे त्यालाही आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.

लखनौ संघाला यंदाच्या मोसमात मयंक यादवच्या रूपात अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज लाभला आहे, पण दुखापतीमुळे त्याला मागील दोन सामन्यांत खेळता आलेले नाही. बुधवारी त्याने सराव केला. तरीही चेन्नईविरुद्धच्या लढतीत तो लखनौचे प्रतिनिधित्व करील की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT