Tilak Varma an Electrician son got 1.7 crore in IPL 2022 Auction  esakal
IPL

इलेक्ट्रिशियनचा मुलगा IPL लिलावात झाला कोट्याधीश!

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू : आयपीएल ही अशी स्पर्धा आहे जी तुम्हाला शून्यातून शिखरावर घेऊन जाऊ शकते. हे वाक्य पैसा प्रसिद्धी बरोबरच भारतीय संघाची दारे उघडण्याबाबतही लागू होते. बंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात (IPL 2022 Auction) देखील असेच झाले आहे. एका इलेक्ट्रिशियनच्या मुलावर कोट्यावधीची बोली लागली. या 19 वर्षाच्या खेलाडूचे नाव आहे. तिलक वर्मा (Tilak Varma).

तिलक वर्माचे वडील (Tilak Varma Father) इलेक्ट्रिशियनचे (Electrician) काम करतात. त्यांना महागड्या क्रिकेट खेळाचा खर्च पेलवत नव्हता. मात्र हैदराबादच्या चंद्रयानगुट्टा भागात राहणाऱ्या कट शॉट, पूल चांगला मारणाऱ्या तिलकसाठी त्याच्या प्रशिक्षकांनी मदतीचा हात दिला. आता याच तिलक वर्माला आयपीएल लिलावात 1.7 कोटीची बोली लागली.

डावखुरा फलंदाज तिलक वर्माला (Tilak Varma) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 1.7 कोटीची बोली लावून आपल्या संघात घेतले. तिलक वर्मा हा 2022 च्या वर्ल्डकप विजेत्या संघात देखील होता. तो मधल्या फळीत फलंदाजी करतो. मात्र त्याला वर्ल्डकपमध्ये फारशी खेळण्याची संधी मिळाली नाही. तो देशांतर्गत क्रिकेट सामन्यात हैदराबादचे ( Hyderabad) प्रतिनिधित्व करतो. त्याची यंदाच्या लिलावात बेस प्राईस 2 लाख इतकीच होती. त्याच्यासाठी पहिल्यांदा सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने बोली लावण्यास सुरूवात केली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्सने लिलावात उडी घेतली.

अखेर तिलकला मुंबई इंडियन्सने आपल्या चमूत खेचण्यात यश मिळवले. दरम्यान, आयपीएलमध्ये तिलकसाठी बोली लावण्यात चार संघांत चढाओढ झाली. हा चर्चेचा विषय ठरला. मात्र तिलक वर्मा या सगळ्याचे श्रेय आपले प्रशिक्षक सलाम बायश यांना देतो. तो म्हणतो की, त्यांनीच क्रिकेट (Cricket) खेळण्यासाठी लागणारे सर्व सामान आणि प्रशिक्षण त्यांनी दिले. वेळ पडल्यास जेवणाखाण्याची सोय देखील केली. तिलकचे वडील नम्बूरी नागराजू आपल्या मुलाला क्रिकेट अकादमीत पाठवण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र सलाम यांनी तिलकचा आर्थिक भार उचलला याच जोरावर तिलक आता इथंपर्यंत पोहचला आहे.

याबाबत तिलक वर्मा म्हणतो, 'तुम्ही माझ्याबाबतीत काही लिहू नका मात्र माझे कोच सर यांचा उल्लेख मात्र नक्की करा.' तिलक वर्माने आतापर्यंत 15 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 29.30 च्या सरासरीने तर 143.77 च्या स्ट्राईक रेटने 381 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. याचबरोबर ते ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT