Twitter Blue Ticks esakal
IPL

Twitter Blue Ticks : पैसे भरण्यास नकार? सचिन, विराटसह अनेकांनी गमावला ट्विटरवरील 'अधिकृत'पणा

अनिरुद्ध संकपाळ

Twitter Blue Ticks : भारतातील स्टार खेळाडू सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने ट्विटरवरील आपली ब्लू टिक गमावली आहे. या ब्लू टिकमुळे स्टार आणि सेलिब्रेटी लोकांचे हे अधिकृत अकाऊंट आहे याची ओळख व्हायची. मात्र आता हा ब्लू चेकमार्क हटवण्यात आला आहे.

ट्विटरने यापूर्वी त्यांची ब्लू टिक ही पत्रकार, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रेटी लोकांना फुकटात दिली होती. सोशल मीडियावरील माहिती अधिक पारदर्शता असावी, स्पॅम आणि सेलिब्रेटींच्या तोतया सोशल मीडिया अकाऊंट्सवर अंकुश रहावा हा याचा उद्येश होता.

मात्र प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर गेल्या वर्षी आता ब्लू टिकसाठी महिन्याला पैसे द्यावे लागतील असे जाहीर केले होते. जे पैसे भरणार नाहीत त्यांची ब्लू टिक काढून घेण्यात येईल सांगितले होते. त्याप्रमाणे गुरूवारपासून ही ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

ट्विटरने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून बुधवारी ट्विट केले, 'उद्या 4/20 आम्ही ऐतिहासिक अधिकृत अकाऊंटचा चेकमार्क हटवत आहोत.'

विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्याप्रमाणेच एमएस धोनी, रोहित शर्मा, सायना नेहवाल, नीरज चोप्रा, बजरंग पुनिया, विनेश फोगाट, निखत झरीन, सानिया मिर्झा, सुनिल छेत्री पीआर श्रीजेश यांची देखील ब्लू टिक ट्विटरने हटवली आहे.

याचबरोबर जागतिक स्तरावरील स्टार खेळाडू रॉजर फेडरर, राफेल नदाल, ख्रिस्तियानो रोनाल्डो, एम्बाप्पे, स्टेफन कुरी यांच्या अकाऊंटची देखील ब्लू टिक हटवण्यात आली आहे.

आता इथून पुढे वैयक्तिक आणि संस्थेची ट्विटर अकाऊंट ब्लू टिकचे सबस्क्रिप्शन घेतील त्यांनाच ही अधिकृत अकाऊंटची टिक मिळणार आहे. ट्विटरची अधिकृत अकाऊंटसाठीचे सबस्क्रिप्शन हे वेबसाठी 650 आणि मोबाईलासाठी 900 रूपयांना मिळणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT