Travis Head | IPL 2024
Travis Head | IPL 2024 Sakal
IPL

Travis Head: कुलदीपनं रोखलं हेडचं वादळ, वाचला युसूफ पठाणचा 14 वर्षापूर्वीचा 'तो' विक्रम

प्रणाली कोद्रे

Travis Head: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 35 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या सलामीवीरांनी ताबडतोड फलंदाजी केली.

हैदराबादकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी आक्रमक खेळताना अवघ्या 5 षटकात संघाला 100 धावा पार करून दिल्या होत्या.

मात्र, 7 व्या षटकात अभिषेक 12 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. पण तोपर्यंत त्याची आणि ट्रेविस हेडची 131 धावांची सलामी भागीदारी झाली होती. तो बाद झाल्यानंतरही हेडने त्याचा फॉर्म कायम ठेवला होता.

परंतु, 9 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवने हेडला ट्रिस्टन स्टब्सच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे हेड 32 चेंडूत 89 धावा करून बाद झाला. यामुळे हेडची शतक करण्याची तर संधी हुकलीच याबरोबरच एक मोठा विक्रम करण्याचीही संधी हुकली.

हेडची मोठी संधी हुकली

जर हेडने 37 चेंडूंच्या आत शतक केले असते तर तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला असता. दरम्यान हेडने या खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार मारले.

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध 30 चेंडूत शतक ठोकले होते. 

तसेच दुसऱ्या क्रमांकावर युसूफ पठाण आहे. त्याने राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्स विरुद्ध 2010 साली 37 चेंडूत शतक केले होते.

कुलदीपची शानदार गोलंदाजी

सुरुवातीला हैदराबादच्या सलामीवारांनी आक्रमण केल्यानंतरही कुलदीपने दिल्लीला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न केला. त्यानेच हेडपूर्वी 7 व्या षटकात अभिषेक शर्माला अक्षर पटेलच्या हातून झेलबाद केले होते.

तसेच याच षटकात त्याने एडेन मार्करमलाही अवघ्या एका धावेवर बाद केले होते. त्यामुळे हैदराबादच्या धावगती कमी करण्यात दिल्लीला यश मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT