Tristan Stubbs DC vs MI esakal
IPL

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

अनिरुद्ध संकपाळ

Tristan Stubbs DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सचा मॅच फिनिशर ट्रिस्टन स्टब्सने मुंबई इंडियन्सविरूद्ध वूडचा धुरळा पाडला. त्यानं एकाच षटकात 26 धावा चोपून वूडची सगळी इकॉनॉमी बिघडवून टाकली. सामन्याच्या 18 व्या षटकात स्टब्सने वूडच्या षटकाची सुरूवात दोन चौकारांनी केली त्यानंतर त्यानं तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकत आता काय आपण थांबत नसतो असे संकेतच दिले. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूत सलग तीन चौकार मारत एकाच षटकात 26 धावा वसूल करून घेतल्या.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ल्यूक वुड चांगलाच महागात पडला. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 68 धावा दिल्या. त्याला यश मिळाले असले तरी तो खूप महागात पडला. याशिवाय कर्णधार हार्दिक पांड्यानेही गोलंदाजीत जोरदार फटकेबाजी केली. हार्दिकने केवळ 2 षटकात 41 धावा दिल्या.

मुंबईविरुद्ध नाणेफेक गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने शानदार फलंदाजी करत निर्धारित 20 षटकांत 257 धावा केल्या. दिल्लीकडून जेक फ्रेझर मॅकगर्कने 27 चेंडूत 84 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने 25 चेंडूत 48 धावा करून नाबाद राहिला. शाई होपने 17 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले तर अभिषेक पोरेसने 36 आणि कर्णधार ऋषभ पंतने 29 धावा केल्या.

दिल्लीच्या 258 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. 12 षटकात त्यांचा निम्मा संघ 140 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. मुंबईच्या जरी विकेट्स पडत असल्या तरी त्यांची धावगती चांगली आहे. हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 46 धावांची खेळी केली.

आता सर्व मदार ही तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांच्यावर आहे. मात्र धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर पाहता दिल्लीची सामन्यावर मजबूत पकड निर्माण झाली आहे. दिल्लीकडून खलील अहमद आणि रासिख दार सलामने प्रत्येकी 2 विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडलं.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका कमी, पावसाची होणार एन्ट्री, आज तुमच्या भागात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 जानेवारी 2026

Yogi Government : योगी सरकारचा मोठा प्लॅन; उत्तर प्रदेशात ग्रामीण अर्थव्यवस्थेची धुरा आता महिलांच्या हाती

आजचे राशिभविष्य - 27 जानेवारी 2026

Panchang 27 January 2026: आजच्या दिवशी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण व ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT