Ravindra Jadeja - MS Dhoni Sakal
IPL

MS Dhoni: जडेजाच्या यु-टर्नमागे कॅप्टनकूलचंच डोकं, 'त्या' संभाषणाबाबत तुषार देशपांडेचा खुलासा

Ravindra Jadeja: कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान जडेजाने फलंदाजीला येता येता घेतलेल्या यु-टर्नमागे धोनीचं डोकं असल्याचा खुलासा तुषार देशपांडेने केला आहे.

Pranali Kodre

MS Dhoni - Ravindra Jadeja : इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला होता. एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील खरी कहाणी चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने सांगितली आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की कोलकाताने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 3 धावांची गरज असताना धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

पण त्याआधी धोनी पायऱ्यांवरून खाली येण्यापूर्वी रविंद्र जडेजाने बॅटवैगरे घेऊन मैदानात फलंदाजीला जात असल्याचे नाटक केले. तो काही पावले पुढे गेला आणि लगेचच मागे फिरला, त्यानंतर धोनी ड्रेसिंग रुममधून खाली आला आणि मैदानात फलंदाजीसाठी गेला.

दरम्यान, जडेजाने प्रेक्षकांबरोबर केलेल्या थट्टेमुळे चेन्नईच्या डगआऊटमध्येही हस्याचा फवारा उडाला. दरम्यान, ही थट्टा पूर्वनियोजित असल्याचा खुलासा देशपांडेने केला आहे.

आयपीएलने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशपांडेने सांगितले की 'त्याने (धोनीने) जड्डू भाईला सांगितले होते, तू फक्त बाहेर जा, पण नंतर मी फलंदाजीला जाईल. मी (देशपांडेने) त्यांचं हे संभाषण ऐकलं होतं.'

त्यानंतर जडेजाने सांगितलं की प्रेक्षकांना धोनीची फलंदाजी पाहायची होती. तो म्हणाला, 'त्याने फक्त आपली एक झलक दाखवली, तर त्यांचे पैसे वसूल होऊन जातील.'

यानंतर जडेजा आणि तुषार यांनी कोलकाताविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीबाबत आपली प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये दिली.

कोलकाताविरुद्ध जडेजा आणि तुषार यांनी कामगिरी खूप महत्त्वाची ठरली. या दोघांनीही गोलंदाजीत केलल्या शानदार कामगिरीमुळे कोलकाताला 20 षटकात 9 बाद 137 धावाच करता आल्या.

जडेजाने 4 षटकात अवघ्या 18 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच तुषारने 4 षटकात 33 धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 17.4 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक नाबाद 67 धावांची खेळी केली. यावेळी त्याच्यासह एक धाव करून धोनी नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT