Urvashi Rautela reacts to woman holding a placard Thank God Urvashi is not here post Rishabh Pant appearance at IPL match 
IPL

IPL 2023 : 'नशीब इथं उर्वशी नाही...', LIVE मॅचमध्ये पंतच्या फॅननं केलं असं कृत्य, अभिनेत्री संतापली

स्टेडियमवरील ‘त्या’ मुलीचा फोटो शेअर करत उर्वशीने केला सवाल

धनश्री ओतारी

क्रिकेट विश्वात आयपीएलमध्ये जखमी झालेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची हवा पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात पंतने हजरी लावल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाची पुन्हा चर्चा क्रिकेट जगतात रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे चाहत्याचे पोस्टर. (Urvashi Rautela reacts to woman holding a placard Thank God Urvashi is not here post Rishabh Pant appearance at IPL match)

सध्या सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होताना दिसत आहे. सामन्यादरम्यान, एका महिला चाहत्याने पंत आणि उर्वशीसंदर्भात पोस्टर मैदाना झळकावले. तिच्या त्या पोस्टरवरील आशयावरुन असे वाटते की ती पंतची चाहती आहे.

या महिला चाहत्याने हातात एक प्लेइंग कार्ड ठेवले आणि त्यावर लिहिले, 'थँक गॉड उर्वशी इथे नाही.' महिला चाहत्याचा हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर हे पोस्टर उर्वशीपर्यंत पोहचले आहे. तिने हे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत का? असा एका शब्दातच सवाल उपस्थित केला आहे.

उर्वशीचे ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने पंतला नजर लागली असती. असे म्हणत उर्वशीच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

उर्वशी-ऋषभचा नेमका वाद काय?

उर्वशी आणि ऋषभ एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र नंतर सोशल मीडियावर दोघांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांना टोमणे मारले. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला. या दोघांमधील वाद जगजाहीर आहे.

ऋषभच्या अपघातानंतर उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयाच्या इमारतीचा फोटो पोस्ट केला होता. त्याच रुग्णालयात ऋषभवर उपचार सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT