Stoinis-Clean-Bowled 
IPL

Video: युवा शिवम मावीने उडवला अनुभवी स्टॉयनीसचा त्रिफळा

विराज भागवत

स्टॉयनीसने मोठा फटका खेळण्यासाठी बॅट फिरवली अन्...

IPL 2021 Qualifier 2 DC vs KKR: शिखर धवनची संयमी ३६ धावांची खेळी आणि श्रेयस अय्यरची नाबाद ३० धावांची खेळी याच्या जोरावर दिल्लीच्या संघाने कोलकाताविरूद्ध २० षटकात १३५ धावांपर्यंत मजल मारली. कोलकाताच्या गोलंदाजांनी पहिल्यापासूनच शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. तब्बल ६ सामन्यानंतर संघात स्थान मिळालेल्या मार्कस स्टॉयनीसचा तर युवा शिवम मावीने त्रिफळा उडवला.

प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला चांगली सुरूवात मिळवून दिली. पण पृथ्वी शॉ १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉयनीस मैदानात आला. त्याला पिचवर स्थिरावण्यात बराच काळ गेला. पण सेट झाल्यानंतरही त्याला फारशी फटकेबाजी करता आली नाही. युवा शिवम मावीच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यामुळे २३ चेंडूत केवळ १ चौकार लगावत १८ धावांवर तो क्लीन बोल्ड झाला.

स्टॉयनीस बाद झाल्यावर थोड्याच वेळात शिखर धवनदेखील ३९ चेंडूत ३६ धावा काढून बाद झाला. त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावले. धवननंतर कोणताही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. ऋषभ पंत ६ धावांवर माघारी परतला. शिमरॉन हेटमायरला एक जीवनदान मिळालं पण तो १७ धावा काढून धावबाद झाला. श्रेयस अय्यर शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरत २७ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या आणि संघाला १३५ धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT