Virat Kohli IPL 2023  esakal
IPL

Virat Kohli IPL 2023 : 23 एप्रिलचा भोपळा बहाद्दर! सचिनच्या बर्थडेचा आदला दिवस विराटसाठी ठरतोय 'अनलकी'

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IPL 2023 : विराट कोहली आयपीएलच्या 16 व्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या सहा सामन्यातच 4 अर्धशतके ठोकली आहेत. तो सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे गेल्या सामन्यात तो पुन्हा आरसीबीचा कर्णधार झाला होता. आजच्या राजस्थानविरूद्धच्या सामन्यात देखील तो संघाचे नेतृत्व करतोय. मात्र आजच्या सामन्यात त्याला ट्रेंट बोल्टने आल्या पावली माघारी धाडले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली शुन्यावर पायचीत झाला.

राजस्थान रॉयल्सच्या बोल्टविरूद्ध पॉवर प्लेमध्ये धावा करणे तितके सोपे नसते. त्याने या हंगामात दोनदा पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. विराट देखील बोल्टचा इन स्विंग ओळखण्यात चुकला आणि चेंडू थेट पॅडवर आदळला. अंपायरने देखील लगेच बोट दाखवत विराटला पॅव्हेलियनची वाट धरायला लावली.

विशेष म्हणजे 23 एप्रिल हा दिवस विराट कोहलीसाठी खास लकी नाही. आयपीएलमध्ये या दिवशीचे विराटचे रेकॉर्ड खराब आहे. हा दिवस बरोबर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसादिवशीचा आदला दिवस येतो. विराट कोहली 2012 मध्ये राजस्थानविरूद्ध झालेल्या 23 एप्रिलच्या सामन्यात 16 चेंडूत 16 धावा करून बाद झाला होता. तर 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरूद्ध 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला.

2017 मध्ये केकेआरविरूद्ध विराट आणि 2022 मध्ये हैदराबादविरूद्ध विराट कोहली 23 एप्रिललाच शुन्यावर बाद झाला होता. आता तिसऱ्यांदा विराट कोहली 23 एप्रिलला शुन्यावर बाद झाला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT