IPL

RCB vs SRH : विराट पाठोपाठ आरसीबीचा देखील बॅड पॅच?

सकाळ डिजिटल टीम

सनराईजर्स हैदराबादने (SunRisers Hyderabad) आपला विनिंग फॉर्म बलाढ्य रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) समोर देखील कायम राखला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करताना आरसीबीला 68 धावात गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान एका फलंदाजाच्या मोबदल्यात 8 व्या षटकात पार केले. हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार 47 धावा ठोकल्या. तर कर्णधार केन विल्यमसनने सावध फलंदाजी करत 17 चेंडूत 16 धावा केल्या. या सामन्यात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) शुन्यावर बाद झाला. सलग दोन सामन्यात गोल्डन डकवर बाद होणारा विराट कोहली मोठ्या बॅडपॅचमध्ये अडकला असल्याचे दिसते. विराटच्या बॅडपॅच सोबतच आतापर्यंत चांगली खेळत असणारी आरसीबी देखील पराभवाच्या गर्तेत अडकते काय अशी शंका चाहत्यांच्या मनात घोळत आहे.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेले 69 धावांचे माफक आव्हान सनराईजर्स हैदराबादच्या सलामीवीरांनीच पार करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी पॉवर प्लेमध्येच 56 धावा ठोकल्या. त्यात अभिषेक शर्माच्या आक्रमक 47 धावांचा मोठा वाटा होता. मात्र सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असताना अभिषेक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर विल्यमसनने आठव्या षटकाच्या शेवट्च्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकून दिला.

आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि सनराईजर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय मार्को जेनसेनने दुसऱ्या षटकात योग्य ठरवला. त्याने दुसऱ्या चेंडूवर फाफ ड्युप्लेसिसचा त्रिफळा उडवला.

त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर जेनसेनने आरसीबीचा स्टार विराट कोहलीला बाद करत मोठा धक्का दिला. विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला. जेनसेलना हॅट्ट्रिक चान्स होता. मात्र त्याला हॅट्ट्रिक साधता आली नाही. असे असले तरी त्याने त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अनुज रावतला शुन्यावर बाद करत एकाच षटकात आपला तिसरा बळी टिपला.

मार्को जेनसेनने धडाक्यात सुरूवात करून दिल्यानंतर हैदराबादच्या इतर गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजीला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. जगदीशा सुचितने प्रभुदेसाई आणि दिनेश कार्तिकला एकाच षटकात बाद करत पुन्हा एकदा मोठा हादरा दिला. आरसीबीकडून जेनसेन आणि टी नटराजनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर सुचितने दोन तर मलिक आणि भुवनेश्वरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. यामुळे आरसीबीचा संपूर्ण संघ 68 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT