Virat Kohli Anchor Inning esakal
IPL

Virat Kohli : अँकर इनिंग खेळणाऱ्या बॅट्समनची अखेरची घरघर .... विराटने 46 चेंडूत 55 धावा केल्यानंतर पॉटिंग काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Anchor Inning : आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली. मात्र ही खेळी आरसीबीला विजय मिळवून देऊ शकली नाही. आरसीबीला 20 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारता आली. हे आव्हान दिल्लीने 17 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. यंदाच्या आयपीएल हंगामात 200 प्लस धावसंख्याही सातत्याने चेस होत आहे.

दरम्यान, विराटच्या या संथ खेळीनंतर क्रिकेट वर्तृळात आता टी 20 क्रिकेटमध्ये अँकर इनिंग खेळणारे फलंदाज शेवटची घटिका मोजत आहेत का अशी चर्चा सुरू झाली. विराट कोहली हा सलामीला फलंदाजीला येत शेवटपर्यंत खेळण्यावर विश्वास ठवतो. मात्र त्याने दिल्ली विरूद्ध पहिल्या 18 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. त्यामुळे आरसीबीला 20 धावांची कमतरता भासली. टी 20 क्रिकेटमध्ये 20 धावा या जय - पराजय ठरवतात.

त्यामुळे आता अँकर इंनिंग खेळणारे किंवा बॉल टू रन रणनितीने फलंदाजी करणारे फलंदाज आता टी 20 मध्ये संयुक्तिक राहिलेले नाहीत का अशी चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉटिंगने टी 20 मध्ये अँकर इनिंग खेळणाऱ्यांच्या भविष्याबाबत शंका व्यक्त केली. सनराईजर्सविरूद्धच्या सामन्यावेळी रिकी पाँटिंग म्हणाला होता की, 'मला वाटते की अँकर रोल असलेल्या फलंदाजांच्या टी 20 मधील भविष्याबाबत शंका उपस्थित होते. जर तुम्ही आक्रमक, शक्तीशाली फलंदाज असाल तर तुम्ही तुमचा खेळ बदलून अँकर रोल निभावू शकता. मात्र अँकर रोल निभावणारे फलंदाज हे आपला खेळ बदलत 200 च्या स्ट्राईक रेटने फार कमी वेळा दिसतात. या वर्षी असं करण्यात फक्त अजिंक्य रहाणेला यश मिळाले आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT