Anushka Sharma-Virat Kohli 
IPL

Virat Kohli : अनुष्काबरोबर डान्स करायला गेला विराट अन् IPL मधुन झाला बाहेर?

अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये....

Kiran Mahanavar

Anushka Sharma-Virat Kohli : आयपीएल-2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या बॅटवर धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे पॉवरफुल कपल्सपैकी एक आहे. ही जोडी अनेकदा चर्चेत असते. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. चाहत्यांनीही दोघांवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पत्नी अनुष्का शर्मासोबत जिममध्ये दिसत आहे. यादरम्यान विराट कोहलीने असे काही केले ज्यामुळे त्याला दुखापतीचा सामना करावा लागला.

अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जिममध्ये डान्स करताना दिसत आहेत. कोहलीने अनुष्कासोबत अशा डान्स मूव्ह्स केल्या त्यावेळी दुखण्यामुळे तो कॅमेरा फ्रेममधून बाहेर पडला. मात्र, विराट कोहलीची ही दुखापत गंभीर नसून तो येत्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.

विराट कोहलीची आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत 7 सामन्यात 279 धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीच्या बॅटने 4 अर्धशतके झळकावली आहेत. IPL 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीही चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय तो या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.

विराट कोहली गेल्या दोन सामन्यांसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपदही सांभाळत आहे. या दोन्ही सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने बाजी मारली आहे. अलीकडेच इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी पराभव केला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघही गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT