Virat Kohli And Gautam Gambhir Fight 
IPL

IPL 2023: भांडण आलं अंगाशी... BCCI ने विराट कोहली अन् गौतम गंभीरवर घेतली मोठी ॲक्शन

Kiran Mahanavar

Virat Kohli and Gautam Gambhir Fined : इंडियन प्रीमियर लीग 2023च्या 43 व्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा विराट कोहली आणि लखनऊ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात जोरदार भांडण झाले. तेव्हा क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

प्रकरण इतके वाढले होते की अनेक खेळाडूंना हस्तक्षेप करून बचाव करावा लागला. क्रिकेटची ही लाजिरवाणी घटना लखनौविरुद्ध आरसीबीने सामना जिंकल्यावर पाहायला मिळाली. सामना संपल्यानंतर मैदानावर एकच गोंधळ उडाला. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विराट कोहली आणि गौतम गंभीरला शिक्षा केली आहे.

बीसीसीआयने लखनौ सुपर जायंट्स आणि अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन-उल-हक यांनाही सोडले नाही. नवीन-उल-हक सामन्यादरम्यान विराट कोहलीसोबत भांडताना दिसला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना बीसीसीआयने त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे.

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हकला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला होता. वाद इतका वाढला की बाकीच्या खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा अमित मिश्रा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसही मदतीला आल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. याआधी 17व्या षटकात नवीन-उल-हक मैदानावर विराट कोहलीसोबत वाद घालताना दिसला. सामना संपल्यानंतरही नवीन-उल-हक कोहलीशी हस्तांदोलन करताना भांडताणा दिसला. याशिवाय कोहली काइल मेयर्ससोबत बोलत असताना गौतम गंभीरने अचानक मेयर्सला कोहलीपासून दूर नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये नवा नियम! आता फलंदाज नाही खेळू शकणार 'हा' शॉट, गोलंदाजांना होणार फायदा...

Video : पूर्णा आजीने एंट्री केल्या केल्या प्रियाला थोबडवलं ! प्रोमो पाहून प्रेक्षक झाले खुश "ज्जे बात..!"

Gold Reserves: आरबीआयचा सोन्याचा साठा पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलर्सच्या वर; भारताचा परकीय चलन साठा किती आहे?

धक्कादायक! कल्याणमध्ये अश्लील व्हिडिओ बनवून प्रेयसीवर बलात्कार; राजकीय पक्षातील तरूणानं केला छळ, ब्लॅकमेलचाही केला प्रयत्न

पुणे मुंबई एक्सप्रेस वे ते पुणे-नगर, सातारा, नाशिक मार्गावरही प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT