Virat Kohli RCB vs GT  esakal
IPL

Virat Kohli RCB vs GT : विराट भाऊचे सलग दुसरे शतक, आरसीबी अडचणीत असताना किंग कोहली शेवटपर्यंत झुंजला

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans : मुंबई इंडियन्सने सनराईजर्सचा पराभव केल्यानंतर आरसीबीवर गुजरातविरूद्धचा सामना जिंकण्याचा मोठा दबाव होता. त्यात पावसामुळे सर्व परिस्थिती दोलायमान स्थितीत होती. मात्र विराट कोहलीने यात दबावाच्या सामन्यात पुन्हा एकदा आपली झुंजार वृत्ती दाखवली. त्याने 101 धावांची शतकी खेळी करत आरसीबीला 197 धावांपर्यंत पोहचवले. विराटनंतर आरसीबीकडून फाफ ड्युप्लेसिसने सर्वाधिक 28 धावा केल्या.

विराट कोहलीचे हे आयपीएलमधील सातवे शतक ठरले. विराट कोहलीने ख्रिस गेलचे आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम देखील मागे टाकला. विराटची ही यंदाच्या हंगामातील सलग दुसरी शतकी खेळी ठरली. विराट कोहली आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा शिखर धवन, जॉस बटलर यांच्यानंतरचा दुसरा खेळाडू ठरला.

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या सामन्यात आरसीबीने पॉवर प्लेच्या पहिल्या काही षटकांमध्ये अडखळती सुरूवात केली. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी धावाची गती वाढवली. त्यांनी 6 षटकात 60 धावा केल्या. मात्र पॉवर प्लेनंतर फाफ ड्युप्लेसिस 28 धावा करून बाद झाला.

ड्युप्लेसिस बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र त्याला मॅक्सवेलची साथ 11 धावांपर्यंत मिळाली. पाठोपाठ महिपाल लोमरोर देखील 1 धाव करून माघारी गेला. दरम्यान, विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

आरसीबीची अवस्था 3 बाद 85 धावा अशी झाल्यानंतर विराटने मायकल ब्रेसवेलसोबत चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचली. ब्रेसवेलनेही 16 चेंडूत 26 धावा चोपत 47 धावात आपला वाटा उचलला. मात्र ही जोडी शमीने फोडली. पाठोपाठ यश दयालने दिनेश कार्तिकला शुन्यावर बाद केले.

आरसीबीचे एक एक फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत असताना विराट कोहली आपल्या शतकाकडू कूच करत होता. तो आक्रमक फटकेबाजी करत चौकारांची बरसात करत होता. त्याला साथ देण्याासाठी आलेल्या अनुज रावतने 13 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या दरम्यान विराट कोहलीने 13 चौकार 1 षटकार मारत 61 चेंडूत नाबाद 101 धावा चोपल्या. अखेर अनुज आणि विराटने सहाव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचत आरसीबीला 20 षटकात 197 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT