Virat Kohli SRH vs RCB  esakal
IPL

Virat Kohli SRH vs RCB : पुन्हा एकदा 400 पार! विराटनं इतिहास रचला; आयपीएलच्या 10 हंगामात अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Become First Batter To Score 400 Plus Runs In 10 IPL Season SRH vs RCB IPL 2024 : आयपीएलमध्ये आज सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने दमदार सुरूवात केली. विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने आक्रमक सुरूवात करून दिली.

विराट कोहलीने आज एक मोठा इतिहास देखील रचला. विराट कोहलीने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील आपल्या 400 धावा पूर्ण केल्या. याचबरोबर विराट कोहली हा आयपीएलच्या 10 हंगामात 400 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने 4 षटकातच अर्धशतक धावफलकावर लावलं होतं. मात्र टी नटराजन आणि मार्कंडेयने आरसीबीला दोन धक्के दिले. या धक्क्यातून विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी संघाला सावरलं.

या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी रचली. रजत पाटीदारने आक्रमक पवित्रा घेतला तर विराट कोहली अँकर इनिंग खेळली. या दोघांनी आरसीबीला 13 षटकात 130 धावांपर्यंत पोहचवलं. रजत पाटीदारनं 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक सुरळीत

Washim: केनवड–कोयाळी रस्त्यावर मृत्यूचे सापळे; तारा लोंबकळल्या, रस्ते खचले; प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र गप्प

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

SCROLL FOR NEXT