Virat Kohli esakal
IPL

Virat Kohli CSK vs RCB : विराट कोहली 12 हजारी मनसबदार! 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Become First Indian Batter To Complete 12000 Runs In T20 Cricket : आयपीएल 2024 च्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये 12000 धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहेत. तर जागतिक स्तरावरील तो सहावा फलंदाज ठरला.

याचबरोबर आजच्याच सामन्यात विराट कोहलीने अजून एक मोठा माईल स्टोन गाठला. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 1000 आयपीएल धावा पूर्ण केल्या. यापूर्वी चेन्नईविरूद्ध 1000 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम हा गब्बर अर्थात शिखर धवनच्या नावावर होता.

सर्वात कमी इनिंगमध्ये 12000 टी 20 धावा पूर्ण करणारे फलंदाज

ख्रिस गेल - 345 डाव

विराट कोहली - 360 डाव

डेव्हिड वॉर्नर - 368 डाव

एलेक्स हेल्स - 432 डाव

शोएब मलिक - 451 डाव
कायरन पोलार्ड - 550 डाव

पुरूष टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

ख्रिस गेल - 14562 धावा

शोएब मलिक - 13360 धावा

कायरन पोलार्ड - 12900 धावा

एलेक्स हेल्स - 12319 धावा

डेव्हिड वॉर्नर - 12065 धावा

विराट कोहली - 12000धावा

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून आरसीबीने दमदार सुरूवात केली. पहिल्या चार षटकातच 41 धावा केल्या. मात्र त्यानंतर मुस्तफिजूर रहीमने एका पाठोपाठ एक असे चार धक्के देत आरसीबीची अवस्था 5 बाद 78 धावा अशी केली. दीपक चाहरने देखील एक विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली.

मात्र त्यानंतर अनुज रावत आणि दिनेश कार्तिक अर्धशतकी भागीदारी करत संघाला 18 षटकात 5 बाद 148 धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT