IPL

Virat Kohli IPL 2023 : @200! IPL चा 16 वा हंगाम सुरू होताच किंग कोहली आलाय भलत्याच रंगात

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli IPL 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली बराच काळ बॅड पॅचमध्ये होता. मात्र आता तो भूतकाळ झाला असून विराट कोहली पुन्हा एकदा जुन्या अवतारात परतला आहे. त्याने भारताकडून टी 20, वनडे आणि त्यानंतर कसोटीत शतकी खेळी करत आपला शतकांचा दुष्काळ संपवला होता.

आता तो आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. विराट कोहलीने हंगामाचीत सुरूवात दमदार केली होती. त्याने मुंबई इंडियन्सविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात 49 चेंडूत नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी केली. यानंतर केकेआरविरूद्ध त्याला 21 धावांच्या पुढे मजल मारता आली नाही. मात्र लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध 44 चेंडूत 61 धावा केल्या. पाठोपाठ दिल्ली विरूद्ध अर्धशतकी खेळी करत पहिल्या चार सामन्यात तीन अर्धशतके ठोकली.

विशेष म्हणजे विराट कोहलीने आयपीएलच्या पहिल्या 4 सामन्यात 71.33 च्या सरासरीने 200 धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट हे 147.58 इतके आहे. दिल्ली विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 33 चेंडूत 50 धावांची दमदार खेळी केली. मात्र विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव घसरला.

नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली सुरूवात करूनही दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर मधली फळी ढेपाळल्यामुळे आरसीबीला 20 षटकात 6 बाद 174 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 50 धावा केल्या. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT