virat kohli fight with senior cricketers gautam gambhir  
IPL

Virat Kohli: आधी कुंबळे...नंतर गांगुली...आता मिश्रा अन् गंभीर, कोहली वरिष्ठांचा आदर करायला शिकलाच नाही का?

वरिष्ठ खेळाडूंसोबतच्या वादावरून कोहली होतोय ट्रोल...

Kiran Mahanavar

Virat Kohli Fights with Senior Players : आयपीएलमधील काल रात्रीचा सामना वादांनी भरलेला होता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी विराट कोहली अफगाण क्रिकेटर नवीन-उल-हकशी भिडला आणि त्यानंतर तो अमित मिश्रासोबत भांडतानाही दिसला.

सामना संपल्यानंतर तो पुन्हा एकदा नवीन-उल-हकशी भिडला आणि नंतर एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरसोबत बराच वेळ वाद घातला. सध्या या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. यासोबतच बहुतेक क्रिकेट चाहते विराट कोहलीच्या या वृत्तीला चुकीचे ठरवत आहेत.

भारताच्या वरिष्ठ खेळाडूंबाबत विराटच्या वृत्तीवर क्रिकेट चाहते टीका करत आहेत.चाहत्यांचे म्हणणे आहे की, अमित मिश्रा आणि गौतम गंभीर हे विराट कोहलीच्या तुलनेत खूप सीनियर खेळाडू आहेत आणि प्रत्येक ज्युनियरने आपल्या सीनियरचा आदर केला पाहिजे. कोहली वरिष्ठांचा आदर करायला शिकलाच नाही का?. विशेष म्हणजे विराट कोहली याआधीही वरिष्ठ खेळाडूंशी पंगा घेत आहे.

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असताना एका टप्प्यावर अनिल कुंबळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. कोहलीला कुंबळेची कार्यशैली आवडत नसल्याच्या अनेक बातम्या मीडिया रिपोर्ट्समध्ये येत होत्या. अखेर कुंबळेला प्रशिक्षकपद सोडावे लागले.

त्याचप्रमाणे गेल्या वर्षी विराट कोहलीची बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही भांडण झाले होते. यानंतर या आयपीएलमध्येही विराट कोहली सौरव गांगुलीला रोखताना दिसला. याआधीही तो गौतम गंभीरसोबत भिडला आहे. आयपीएल 2013 दरम्यान त्यांच्यात खूप वाद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, 2 जणांची प्रकृती चिंताजनक

Eknath Shinde: ''सागर बंगल्यावर पोलिस पाठवले तेव्हा...'', ठाकरेंच्या फडणवीसांवरील भूमिकेवरुन एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut song on Sachin Ahir :'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?', संजय राऊतांची सचिन अहिरांवर गाण्यातून टीका

Cashless Health Insurance : आता फक्त 2 तासच हॉस्पिटलमध्ये राहिलं तरी मिळणार कॅशलेस मेडिक्लेम! पण 'या' एका अटीवर

IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT