Virat Kohli First Reaction After RCB defeat in Eliminator  sakal
IPL

Virat Kohli : 'क्षणभर असे वाटत होते की...' RCBच्या पराभवानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया

IPL 2024 RR vs RCB Eliminator Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवानंतर आरसीबीचे करोडो चाहते अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते.

Kiran Mahanavar

IPL 2024 RR vs RCB Eliminator Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवानंतर आरसीबीचे करोडो चाहते अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते. आता विराटने आरसीबीच्या पराभवावर आपले वक्तव्य केले आहे.

पण खरंतर आयपीएल 2024 मध्ये बेंगळुरूने ज्या प्रकारे पुनरागमन केले ते कौतुकास्पद होते. पहिल्या 8 पैकी 7 सामने गमावूनही आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरले, हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते, परंतु एलिमिनेटरमध्ये बेंगळुरूचा पराभव झाला. आता विराट कोहलीने आरसीबीच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यातील पराभवानंतर आरसीबीने ड्रेसिंग रूममधील एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसची आरसीबीचा महान फलंदाज विराट कोहलीची प्रतिक्रिया आहे.

कोहली म्हणाला की, आयपीएल 2024 चे सुरुवातीचे सामने आमच्यासाठी चांगले नव्हते. पण मुद्दा स्वाभिमानावर आला होता, आणि त्यानंतर आम्ही फक्त सेल्फ रिस्पेक्टसाठी खेळ करू लागलो. क्षणभर असे वाटत होते की आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार नाही, पण आम्ही सलग सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचलो. आम्ही प्लेऑफसाठी ज्या प्रकारे पात्र झालो ते मला नेहमी लक्षात राहील. यासाठी संघातील सर्व खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे.

आरसीबी ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, बंगळुरूच्या पुनरागमनाची कहाणी कोणीही विसरणार नाही. आरसीबीने ज्या प्रकारे पुनरागमन केले ते चमत्कारासारखे आहे. पहिल्या 8 पैकी 7 सामने गमावल्यानंतर, बेंगळुरू येथून प्लेऑफ खेळू शकेल असे कोणालाही वाटले नव्हते, परंतु आरसीबीने अशक्य ते शक्य केले.

बेंगळुरूविरुद्धच्या विजयानंतर राजस्थान क्वालिफायर-2 मध्ये पोहोचला आहे. आता क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना 24 मे रोजी चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT