Virat Kohli Gautam Gambhir Controversy  esakal
IPL

Virat Kohli Gautam Gambhir Controversy : गौतम गंभीर - विराट कोहली भिडले अन् राजकारण तापणार कर्नाटकातलं?

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Gautam Gambhir Controversy : आयपीएल 2023 मधील 43 वा सामना हा अत्यंत वादळी ठरला. लखनौ सुपर जायंट्सने आरसीबीला आपल्या घरच्या मैदानावर 126 धावात रोखले. लखनौला 120 चेंडूत 126 धावा करायच्या होत्या. मात्र झुंजार आरसीबीने लखनौचा संपूर्ण डाव 108 धावात गुंडाळला. आरसीबीने सामा 18 धावांनी जिंकला. यात सामन्यात 18 क्रमांकाची जर्सी घालणाऱ्या विराट कोहलीवर कायम कॅमेरा खिळला होता. कारण तो आपल्या संघाला चार्चअप करण्यासाठी सातत्याने हातवारे करत होता. विरोधी संघाच्या होम ग्राऊंडवरील प्रेक्षकांना देखील आपलंस करत त्यांनाही आरसीबीला प्रोत्साहन देण्यास उकसवत होता.

दरम्यान, सामना सुरू असताना विराट कोहली लखनौच्या नवीन उल हक, अमित मिश्रा यांच्याशी देखील भिडला. त्याचा पुढचा अंक सामना झाल्यावरही दिसला. आधीच भडक माथ्याचा गंभीर पराभवाने लाल झाला होता. त्यात विराटने त्याला डिवचल्याने या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. गंभीर तर विराट कोहलीला आफ्रिदी संमजून त्याच्या अंगावर धावून गेला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर रात्रीपासूनच व्हायरल होत होते. याच व्हायरल व्हिडिओच्या भाऊगर्दीत अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला.

काँग्रेसचे कर्नाटकमधील युवा नेते श्रीनिवास यांनी विराट आणि गंभीरच्या बाचाबाचीचा व्हिडिओ शेअर करत भाजपचा खासदार असलेल्या गौतम गंभीरवर निशाणा साधला. श्रीनिवास आपल्या फेसबुकमधील पोस्टमध्ये म्हणतात की, 'प्रिय गौतम गंभीर तू मैदानाबाहेर भाजपचा खासदार असशील मात्र मैदानावर तू खासदार नाहीस. तुला लाज वाटली पाहिजे.'

दरम्यान, बीसीसीआयने या राडेबाजी करणाऱ्या दोन दिग्गज खेळाडूंना चांगलाच दंड ठोठावला. बीसीसीआयने लखनौ सुपर जायंट्स आणि अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन-उल-हक यांनाही सोडले नाही. नवीन-उल-हक सामन्यादरम्यान विराट कोहलीसोबत भांडताना दिसला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना बीसीसीआयने त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला आहे.

लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हकला आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः फाईल करा

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

Jalna Flood: शहरात पावसाचा हाहाकर सीना कुंडलिका नदीला पूर; शहरातील सखल भागात साचले पाणी

SCROLL FOR NEXT