Shikhar Dhawan doppelganger
Shikhar Dhawan doppelganger Sakal
IPL

IPL: सेम टू सेम! धवनसारख्याच दिसणाऱ्या चाहत्याला स्टेडियमच्या स्क्रिनवर पाहून विराटलाही आवरेना हसू, Video व्हायरल

प्रणाली कोद्रे

Shikhar Dhawan doppelganger: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगळुरूने 4 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात एक गमतीशीर घटनाही घडली.

या सामन्यात बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे पंजाब किंग्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पंजाबकडून कर्णधार शिखर धवन सलामीला फलंदाजीला उतरला होता.

धवनने दुसऱ्या विकेटसाठी प्रभसिमरन सिंगबरोबर अर्धशतकी भागीदारीही केली. परंतु, नंतर पंजाबने झटपट विकेट्स गमावल्या. मात्र शिखर पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता. पण तोही 45 धावा करून माघारी परतला.

असे असतानाच धवन पंजाबच्या डगआऊटमध्ये बसलेला असताना 18 व्या षटकादरम्यान अचानक मोठ्या स्क्रिनवर धवनसारखाच हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीला दाखवण्यात आले. प्रेक्षकांमध्ये पंजाब किंग्सची जर्सी घातलेला एक व्यक्ती धवनसारखाच लूक करून सामना पाहायला आला होता.

दरम्यान, त्याला मोठ्या स्क्रिनवर पाहाताच बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराटला त्याचे हसू आवरता आले नाही. ही घटना कॅमेऱ्यातही कैद झाली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात पंजाब किंग्सने 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. पंजाबकडून शिखर व्यतिरिक्त प्रभसिमरन (25), सॅम करन (23), जितेश शर्मा (27) आणि शशांक सिंग (21) यांनी छोटेखानी खेळी केल्या. बेंगळुरूकडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून विराट कोहलीने 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह सर्वाधिक 77 धावांची खेळी केली.

तसेच अखेरीस महत्त्वाच्या क्षणी दिनेश कार्तिक (28) आणि महिपाल लोमरोर (17) यांनी 48 धावांची नाबाद भागीदारी केली आणि अखेरच्या षटकात बेंगळुरूला विजय मिळवून दिला. बेंगळुरूने 20 षटकात 19.2 षटकात 178 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT