SRH vs RCB Virat Kohli eyes huge IPL record  esakal
IPL

Virat Kohli SRH vs RCB : 'विराट' खेळी करत कोहलीला आज संजू सॅमसनचा मोठा विक्रम मोडण्याची संधी

अनिरुद्ध संकपाळ

SRH vs RCB Virat Kohli eyes huge IPL record : आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज 41 वा सामना हा सनराईजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात होत आहे. या सामन्याकडं हंगामातील सर्वात तगडी बॅटिंग आणि हंगामातील सर्वात दुबळी गोलंदाजी यांच्यातील सामना असं देखील पाहिलं जात आहे. गुणतालिकेत सध्या तळात असलेल्या आरसीबीसाठी विराट कोहलीच काय तो एक दिलासा आहे. त्यानं जर आज मोठी खेळी केली तर आरसीबीचा हैदराबादच्या रनगाड्यासमोर थोडा निभाव लागेल.

दरम्यान, विराट कोहलीने आजच्या सामन्यात हैदराबादविरूद्ध जर मोठी खेळी केली तर तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचा मोठा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने आजच्या सामन्यात जर 81 धावा केल्या तर तो संजूला हैदराबादविरूद्ध आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मागं टाकू शकतो.

सध्या सॅमसन 791 धावा करून या यादीत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने हैदराबादविरूद्ध आतापर्यंत 711 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात विराट कोहलीकडे संजूचा हा विक्रम मोडण्याची चांगली संधी आहे.

विराट कोहली हा हैदराबादविरूद्ध कायम चांगला खेळत आला आहे. विशेष करून विराट कोहली हैदराबादमध्ये हैदराबादविरूद्ध चांगल्या धावा करतोय. हैदराबादमध्ये गेल्या दोन सामन्यात विराट कोहलीने चेस करताना दोन शतकी खेळी केल्या होत्या. आजच्या सामन्यातही आरसीबी फॅन्सच्या विराटकडून अशाच काहीशा अपेक्षा असतील.

हैदराबाद विरूद्ध आरसीबी यांच्यातील आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांचा इतिहास पाहिला तर या दोघांनी आतापर्यंत एकमेकांविरूद्ध 23 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यातील 10 सामन्यात आरसीबी तर 12 सामन्यात हैदराबाद जिंकली आहे. एक सामना टाय झाला होता.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

Kolhapur Police Recruitment : कोल्हापुरात पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षा उद्या; ८८ पदांसाठी ११३५ उमेदवार मैदानात

Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ९ वर्षांच्या मुलासमोर घडली धक्कादायक घटना

Kolhapur Water Project : ‘धामणी’चे अतिरिक्त पाणी करवीर तालुक्याला द्यावे; तर, कोल्हापूरला पोलिस आयुक्तालय हवे - नरके

SCROLL FOR NEXT