Virat Kohli | IPL | RCB Sakal
IPL

RR vs RCB: कोहली IPL मध्येही किंग! 29 धावा करताच 'असा' ऐतिहासिक पराक्रम करणारा बनेल पहिलाच क्रिकेटर

Virat Kohli Record: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीला मोठा इतिहास रचण्याची संधी आहे.

Pranali Kodre

Virat Kohli IPL Record: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील प्लेऑफला सुरुवात झाली असून एलिमिनेटरचा सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघ आमने-सामने असणार आहेत.

बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात होणारा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.

विराट सध्या तुफान फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने जर या सामन्यात 29 धावा केल्या, तर तो आयपीएलमध्ये 8000 धावा पूर्ण करेल. तसेच तो आयपीएलमध्ये 8000 धावा करणारा पहिला आणि एकमेव खेळडू ठरेल.

विराटने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत (21 मे 2024 पर्यंत) 251 सामन्यांत 38.69 च्या सरासरीने 7971 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 8 शतकांचा आणि 55 अर्धशतकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे आयपीएलमध्ये अद्याप त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणाला 7000 धावांचा टप्पाही पार करता आलेला नाहीये. आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिखर धवनने 222 सामन्यांत 35.26 च्या सरासरीने 6769 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू (21 मे 2024 पर्यंत)

  • 7971 - विराट कोहली (251 सामने)

  • 6769 - शिखर धवन (222 सामने)

  • 6628 - रोहित शर्मा (257 सामने)

  • 6565 - डेव्हिड वॉर्नर (184 सामने)

  • 5528 - सुरेश रैना (205 सामने)

  • 5243 - एमएस धोनी (264 सामने)

विराट शानदार फॉर्ममध्ये

विराट आयपीएल 2024 मध्ये शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएल 2024 मध्ये 14 सामन्यांमध्ये 64.36 च्या सरासरीने आणि 155.60 च्या स्ट्राईक रेटने 708 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT