Virat Kohli - Faf du Plessis | RCB | IPL 2024 Sakal
IPL

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Impact Player Rule : आयपीएल 2024 च्या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर नियमाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने यापूर्वीच या नियमावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बीसीसीआयने देखील यावर पुन्हा विचार करणार असल्याचं सांगितलं. आता आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने देखील या वादात उडी घेतली आहे.

विराट कोहली म्हणाला की, 'मी याबाबतीत रोहित शर्माचं समर्थन करतो. मनोरंजन हा खेळाचा एक भाग आहे मात्र त्यात समतोल असला पाहिजे. इम्पॅक्ट प्लेअरमुळं समतोल बिघडला आहे. हे असं अनेक लोकांना वाटतं ते फक्त मला वाटत नाही.' काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने देखील पॉडकास्टमध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियमाला विरोध केला होता. यामुळे अष्टपैलू खेळाडूंवर परिणाम होत आहे.

विराटने गोलंदाजांबद्दल व्यक्त केली सहानुभूती

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंत तब्बल आठवेळी 250 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. विराट कोहली म्हणाला की, 'गोलंदाजांना काय करावं तेच कळत नाहीये. गोलंदाजाला वाटतं की त्याच्या प्रत्येक चेंडूवर चौकार किंवा षटकार लागणार आहे. मली असं कधी पाहिलं नव्हतं. प्रत्येक संघाकडे बुमराह किंवा राशिद खान नसतात.'

विराट कोहली पुढे म्हणाला की, 'एका अतिरिक्त फलंदाजामुळे पॉवर प्लेमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. कारण मला माहिती आहे की आठव्या क्रमांकावर देखील फलंदाज आहे. मला वाटतं की क्रिकेटमध्ये फलंदाजांचा इतका दबदाब असू नये. बॅट आणि बॉलमध्ये समतोल असणं गरजेचं आहे.

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT