Virat Kohli IPL 2023 
IPL

Virat Kohli IPL 2023 : 'हा' क्रिकेटचा खरा बॉस! गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीने शेअर केला तो व्हिडिओ

Kiran Mahanavar

Virat Kohli VIDEO : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लखनऊ सुपरजायंट्सचा खेळाडू नवीन-उल-हक आणि मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्याशी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा विराट कोहलीची जोरदार भांडण झाले. आजुन पण अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मात्र, आता तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळण्यासाठी दिल्लीत गेला आहे. कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने क्रिकेटचा खरा बॉस कोण आहे हे सांगितले आहे.

खरंतर, विराटने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू विवियन रिचर्ड्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले - 'द रिअल बॉस'. ही विव्ह रिचर्ड्सची जुनी व्हिडिओ मुलाखत आहे.

त्यात त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलसारखी टी-20 लीग खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रिचर्ड्स हे सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. कसोटी सामन्यात त्याचा स्ट्राईक रेट 86.07 होता.

Virat Kohli IPL 2023

विराट कोहलीचा संघ आरसीबीचा पुढील सामना ६ मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सकडून होणार आहे.

सोमवारी लखनऊ विरुद्धच्या सामन्यात कोहलीची अफगाणिस्तानच्या नवीन आणि मार्गदर्शक गंभीरशी बाचाबाची झाली होती. यानंतर बीसीसीआयने तिघांवरही कारवाई केली.

कोहली आणि गंभीर यांची 100 टक्के मॅच फी आणि नवीनची 50 टक्के मॅच फी कापण्यात आली. लखनौविरुद्धच्या सामन्यादरम्यान कोहली आक्रमक दिसत होता आणि सतत स्लेजिंग करत होता.

बंगळुरूच्या विजयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हातात हात देताना कोहलीने नवीनला काहीतरी सांगितले. कोहली बोलताच नवीनही काहीतरी बोलताना दिसला. येथेही दोघांमध्ये वादावादी झाली.

यानंतर कोहली सीमेवर चालत असताना काइल मेयर्स त्यांच्या जवळ आला आणि बोलू लागला. मग गंभीर येतो आणि मेयर्सला विराटपासून दूर घेऊन जातो आणि त्याच्याशी बोलण्यास नकार देतो. यानंतर गंभीर काहीतरी बोलतो, ज्यावर कोहली त्याच्या जवळ जातो. मग दोघांमध्ये भरपूर बाचाबाची होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT