virat kohli rohit sharma sourav ganguly ipl 2022
virat kohli rohit sharma sourav ganguly ipl 2022 sakal
IPL

विराट आणि रोहितच्या खराब फॉर्मवर गांगुलीचे मोठं वक्तव्य

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू सध्या त्यांच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून जात आहे. टीम इंडियाचा एक माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमध्ये (IPL 2022) या दोघांची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिले आहे. कोहलीने 9 सामन्यांत 128 धावा केल्या असून तो दोनदा खातेही न उघडता आउट झाला. रोहितच्या टीम मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मध्ये एकही सामना जिंकलेला नाही. रोहितने 8 सामन्यात 153 धावा केल्या आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) आशा आहे. दोन्ही फलंदाज लवकरच धमाकेदार पुनरागमन करतील.

सौरव गांगुली एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, रोहित आणि विराट त्यांच्या कारकिर्दी एक कठीण टप्प्यातून जात आहे. हे दोघेही महान खेळाडू आहे. मला खात्री आहे की रोहित आणि विराट लवकरच फॉर्ममध्ये परततील आणि त्याच्या बॅटने मोठी धावसंख्या उभारतील. विराट कोहलीच्या मनात काय चालले आहे हे मला माहीत नाही. पण मी मला खात्री आहे की तो त्याचा फॉर्म परत मिळवेल आणि काही चांगल्या धावा करेल. तो एक महान खेळाडू आहे. आयपीएलबद्दल बोलताना गांगुली म्हणाले की हा हंगाम खूप मनोरंजक असं चालू आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघ या आयपीएलमध्ये खूप चांगली कामगिरी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT