Virat Kohli RCB vs CSK esakal
IPL

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli RCB vs CSK : आज आयपीएलच्या 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होत आहे. प्ले ऑफच्या दृष्टीकोणातून दोन्ही संघांना आज संधी आहे. आरसीबी सध्या 12 गुणांवर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज 14 गुणांवर आहे.

आरसीबीला जर प्ले ऑफ गाठायचं असेल तर त्यांना चेन्नईविरूद्धचा सामना 18 धावांनी जिंकावा लागेल जर चेस करण्याची वेळ आली तर त्यांना जवळपास 200 धावांचे टार्गेट टार्गेट 18 षटकाच्या आत पार करावं लागणार आहे.

विशेष म्हणजे आरसीबीने ज्या प्रकारे यंदाच्या हंगामाची सुरूवात केली होती. ते पाहता ते प्ले ऑफ गाठू शकतील असं वाटत नव्हतं मात्र त्यांनी सलग पाच सामने जिंकत आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या हंगामातील आरसीबीच्या प्रवासाबाबत त्यांचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपले स्पष्ट मत व्यक्त केलं.

जिओ सिनेमाशी बोलताना विराट कोहली म्हणाला की, मी एका क्षणाला आशाच सोडून दिली होती. मी माझ्या बॅग्ज एप्रिल महिन्यातच पॅक केल्या होत्या. मला वाटत होतं की आम्ही प्ले ऑफसाठी पात्र होण्याची कोणतीच संधी नाहीये. मात्र आता पाहा आम्ही कुठंपर्यंत आलो आहे. खेळ कसा पलटला हे पाहणं खूप भारी होतं. या सर्व गोष्टींबद्दल काय बोलणार. बोलण्यासाठी शब्द नाहीयेत.'

विराट कोहली पुढे म्हणाला, 'तुम्ही त्वेशाने खेळत असता, मजा करत आणि तुम्ही अशा परिस्थितीत येता. कोणीही विचार केला नव्हता की आम्ही अशा परिस्थितीत असू.'

आरसीबीबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला की, 'चाहत्यांसोबत, फ्रेंचायजी आणि टीम मेट्ससोब जे एक नातं तयार झालं आहे ते खूप खास आहे. दीर्घ काळासाठी याचा अनुभव घेणं हे विशेष आहे. प्रत्येकाला हे भाग्य लाभत नाही. फ्रेंचायजी तुम्हाला रिटेन करणार नाही याची किंवा तुम्ही फ्रेंजायजीला रिलीज करण्याची विनंती करण्याची शक्यता कायम असते.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

SCROLL FOR NEXT