Virat Kohli Statement About His Strike Rate Issue GT vs RCB IPL 2024 esakal
IPL

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Statement About His Strike Rate Issue GT vs RCB IPL 2024 : आरसीबीनं आज गुजरातला त्यांच्याच होम ग्राऊंडवर मोठी हार दिली. आरसीबीनं गुजरातचं 200 धावांचं आव्हान 17 षटकात फक्त एक फलंदाज गमावून पार केलं. आरसीबीकडून जॅक विलने 41 चेंडूत शतक ठोकलं. तर स्टार विराट कोहलीनं 70 धावा केल्या. विराटनं या 70 धावा 44 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या साथीनं ठोकल्या. त्याचं स्ट्राईक रेट हे 159 च्या पुढे होतं.

सामना झाल्यावर विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरून होणाऱ्या आपल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तो म्हणाला की, 'मी गेले 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी कारण आहे. मी माझं काम करतोय लोकं काय त्यांना वाटलं की ते काहीही बोलतात. ते माझ्याबद्दल मला चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करता येत नाहीत. मी स्पिनर्सला चांगलं खेळत नाही असं बोलतात. मात्र तुम्हाला तुमचा गेम चांगल्या प्रकारे माहिती असतो.'

' आम्ही आमच्या आत्मसन्मानासाठी जास्त खेळतोय. आम्ही आमच्या चाहत्यांसाठी खेळतोय. त्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही आमच्या लौकिकास साजेसा खेळ केलेला नाही. आम्ही अजून बरीच चांगली कामगिरी करू शकलो असतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT