Virat Kohli Trolled Fans 
IPL

विराटच्या स्माईलवर चाहते संतापले; म्हणाले 'हा' तो नाहीच...

बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट या सामन्यातही शांत

Kiran Mahanavar

IPL 2022: आयपीएलचा 39 वा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि राजस्थान रॉयल्सविरुद्व खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने आरसीबीला 29 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यातही त्यांच्या फलंदाजांनी आरसीबीला बुडवले. बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट या सामन्यातही शांत राहिले. (Virat Kohli Trolled By Fans)

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने नवी रणनीती आखली. गेल्या दोन सामन्यांमध्ये दोनवेळा गोल्डन डक ठरलेला कोहली सलामीला उतरला. मात्र फलंदाजीत बदलल्यानंतरही विराटच्या बॅटला धावा करता आल्या नाहीत. तो फक्त 9 धावा करत बाद झाला. कोहली पहिल्या षटकात तीन वेळा वाचला पण अखेरीस प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला.

विराट कोहली डगआऊटवर परतताना चेहऱ्यावर तेच हास्य होते जे तो अनेकदा आऊट झाल्यावर दिसत असते. मात्र यावेळी चाहत्यांना विराटचे हे हसणे अजिबात सहन करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर विराटला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सततच्या फ्लॉप शोनंतर चाहते विराटवर कसे भडकले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 8 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ 19.3 षटकांत 115 धावांवर गारद झाला. राजस्थानचा आठ सामन्यांमधला हा सहावा विजय असून, संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT