IPL

IPL 2024 Virat Kohli : टी-२० क्रिकेट खेळण्याची क्षमता ; विंडीजमधील विश्‍वकरंडक खेळण्याचे संकेत

विराट कोहलीच्या ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने सोमवारी झालेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत पंजाब किंग्स संघावर ४ विकेट व ४ चेंडू राखून विजय मिळवला.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : विराट कोहलीच्या ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने सोमवारी झालेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत पंजाब किंग्स संघावर ४ विकेट व ४ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयानंतर विराटने प्रतिक्रिया देताना म्हटले, की माझ्या नावाचा उपयोग टी-२० क्रिकेटच्या प्रचार व प्रसारासाठी केला जात असे, पण माझ्यामध्ये आताही टी-२० क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. तसेच आकडे व उपलब्धी यासाठी मी खेळत असून विजयासाठी मैदानात उतरतो, असे स्पष्ट करत विराटने आगामी वेस्ट इंडीजमधील टी-२० विश्‍वकरंडकात आपण खेळणार असल्याचे संकेत दिले.

विराट कोहली याने याप्रसंगी टी-२० क्रिकेटमध्ये खेळानुसार बदल करण्याची योजनाही बोलून दाखवली. तो म्हणाला, मी कव्हर ड्राईव्ह चांगल्या प्रकारे खेळतो हे सर्वांनाच माहीत झाले आहे. त्यामुळे ते अशाप्रकारचे चेंडू मला टाकणार नाहीत. कागिसो रबाडा व अर्शदीप सिंग हे उंचपुरे गोलंदाज असल्यामुळे त्यांच्याकडून आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्यात येऊ शकतात. त्यामुळे मी वेगवान गोलंदाजांना पुढे जाऊन फटके मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू जेवढा जवळ जाऊन खेळला जाईल तेवढा फटका मारायला सोपे जाईल. टी-२० क्रिकेटमध्ये खेळानुसार बदल करणे गरजेचे आहे. तेच मी करतो.

दरम्यान, विराट कोहलीचे भारताच्या टी-२० संघातील स्थान अनिश्‍चित असल्याची चर्चा सुरू होती. त्याने लढतीनंतर स्पष्ट मत व्यक्त करीत शंका-कुशंकांना पूर्णविराम लावला. बंगळूरने अद्याप एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. क्रिकेटप्रेमींकडून ही खंत व्यक्त करण्यात येत आहे, पण आकडे, विक्रम यापलीकडेही क्रिकेटपटूंसाठी आणखी काही बाबी महत्त्वाच्या आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून आम्हाला त्याबाबत सांगण्यात येते. सहकारी, ड्रेसिंग रूममधील वातावरण हे खूप महत्त्वाचे आहे. या आठवणी कायमस्वरूपी स्मरणात राहतात.

-विराट कोहली

दोन महिने कुटुंबीयांसोबत

विराट कोहलीने या वेळी दोन महिने कुटुंबीयांसोबत घालवले असल्याचे आवर्जून नमूद केले. तो म्हणाला, मुलाच्या जन्माच्या वेळी आम्ही परदेशात होतो. हे दोन महिने कुटुंबीयांसोबत घालवले. तिथे आम्हाला कुणीही ओळखत नव्हते. मनसोक्त फिरता आले. हा अनुभव शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आता पुन्हा भारतात आल्यानंतर क्रिकेटप्रेमींचा आवाज कानी पडू लागला. याआधीप्रमाणे भावना मनामध्ये निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मालवणी पॅटर्न वादावर असलम शेख यांचे अमित साटम यांना खडेबोल

Pimpri Chinchwad News : अवजड वाहने, खड्डे ठरतायत ‘काळ’; हिंजवडी–ताथवडे पट्ट्यात महिनाभरात दोघींचा मृत्यू!

Sweetlime Rate Decrease : मोसंबी नऊशे रुपये, तर कापुस सात हजार रुपये प्रति क्विंटल

Gadchiroli Premier League: गडचिरोलीत पुन्हा रंगणार क्रिकेटचा उत्सव; महिला क्रिकेट संघाचाही होणार समावेश!

SCROLL FOR NEXT