Virender Sehwag IPL 2023  esakal
IPL

Virender Sehwag IPL 2023 : 18 कोटी रूपयांनी अनुभव खरेदी करता येत नाही... सेहवागने आता कोणाला मारला टोमणा

अनिरुद्ध संकपाळ

Virender Sehwag IPL 2023 : पंजाब किंग्जने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2023 ची दमदार सुरूवात केली होती. मात्र जसा शिखर धवन दुखापग्रस्त झाला आहे. तसे पंजाब किंग्जच्या विजयाला देखील ग्रहण लागले आहे. नुकत्याच झालेल्या रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरूद्धच्या सामन्यात पंजाबसमोर विजयासाठी 175 धावांचे आव्हान होते. हे आव्हान पंजाबसारख्या तगडी बॅटिंग लाईन अप असलेल्या संघासाठी मोठे आव्हान नव्हते. तरी पंजाबचा संघ 150 धावात गुंडाळण्यात आरसीबीला यश आले.

या पराभवानंतर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने पंजाब किंग्जचा काळजीवाहू कर्णधार सॅम करनवर बोचरी टीका केली. सॅम करनच्या नेतृत्वात पंजाबलच्या संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आली नाही. पंजाबने सॅम करनला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी 18.50 कोटीची बोली लावली होती.

सेहवागने याच गोष्टीचा धागा पकडत सॅम करनवर बोचरी टीका केली. सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला की, 'सॅम हा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. मात्र तुम्ही 18 कोटी रूपयात अनुभव खरेदी करू शकत नाही. हा फक्त खेळातून येतो. ज्यावेळी तुम्ही उन्हात खेळून तुमचे केस पांढऱे होऊ लागतात तेव्हाच हा अनुभव येऊ शकतो.'

सेहवाग पुढे म्हणाला की, 'आपण विचार करतोय की त्याला 18 कोटी रूपयांना खरेदी केलं म्हणजे तो आपल्यासाठी सामने जिंकून देईल. मात्र त्याच्याकडे अजून तेवढा अनुभव नाही. खूप वाईट पद्धतीने तो धावबाद झाला. त्याची काहीच गरज नव्हती. तू कर्णधार आहेस तू खेळपट्टीवर थांबायला हवे होते सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायला हवा होता. मात्र अनुभवाची कमतरता पुन्हा एकदा जाणवली.'

आरसीबीविरूद्धच्या पराभवानंतर पंजाब किंग्ज गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरली आहे. पंजाबने आपल्या 6 सामन्यापैकी 3 सामने जिंकले असून 3 सामने गमावले आहेत. पंजाब शिखर धवन फिट होऊन कधी संघाची धुरा पुन्हा एकदा खांद्यावर घेतोय आणि संघ विजयीपथावर पुन्हा परततोय याची वाट पाहत असेल.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

IND vs SL 2nd Test: ४०० पार! ध्रुव जुरेल-रिषभ पंत यांचे अर्धशतक; यष्टिरक्षकाने मोडला MS Dhoni चा सर्वात मोठा विक्रम... बनला टॉपर

Narendra Modi Government : राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

Tamil Nadu LPG Scheme : सरकारचं महिलांना मोठं गिफ्ट ! वर्षाला ३ गॅस सिलिंडर फ्री, डिलक्स बसचा प्रवासही मोफत... मुख्यमंत्र्यांची थेट घोषणा

Pune Bus Accident : पुण्यात बसखाली चिरडून कॉलेज विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू, माणिकबाग परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT