Was Faf du Plessis Talking To Pat Cummins About Rumoured Toss Tampering In MI vs RCB
Was Faf du Plessis Talking To Pat Cummins About Rumoured Toss Tampering In MI vs RCB sakal
IPL

Video : RCB वर अन्याय... फाफ डू प्लेसिसचा धक्कादायक आरोप; मुंबईविरुद्ध टॉसवेळी काय झालं?

Kiran Mahanavar

पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आरसीबीची कामगिरी खराब राहिली आहे. या हंगामात आतापर्यंत त्यांने 7 सामने खेळले त्यापैकी फक्त एक जिंकला आणि 6 सामने हारले आहेत. आरसीबीचा सनरायझर्स हैदराबादकडून सहावा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 287 धावा केल्या. पाठलाग करताना आरसीबीनेही 262 धावा केल्या, हैदराबादला चांगली झुंज दिली पण शेवटी पराभव पत्करावा लागला.

कमिन्स आणि डुप्लेसिसचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये डुप्लेसिस मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कमिन्सला नाणेफेकीची कहाणी सांगताना दिसत आहे.

खरं तर 11 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर आरसीबीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला गेला. फॅफ डू प्लेसिस पॅट कमिन्सला सांगत होता की मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान रेफ्री जवागल श्रीनाथ यांनी नाणेफेकवेळी टॉस उचलला आणि तो फिरवला. याचा अर्थ, आरसीबीने नाणेफेक जिंकली असे डू प्लेसिसला म्हणायचे होते. तो हातवारे करत हे कसे केले गेले हे स्पष्ट करत आहे. आणि कमिन्सही आश्चर्याने त्याचे बोलणे ऐकताना दिसला.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

11 एप्रिल रोजी मुंबई आणि आरसीबी यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक उडावले, जे त्याच्या मागे पडले. त्यानंतर रेफ्री जवागल श्रीनाथ टॉस न फिरवता उचलताना दिसला. त्या टॉसमध्ये श्रीनाथ व्हिडिओमध्ये नाण्याशी छेडछाड करताना दिसत नाही. त्या सामन्यात मुंबईने बेंगळुरूचा 27 चेंडूत 7 गडी राखून सहज पराभव केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT