Who is Future CSK captain after MS Dhoni News in Marathi sakal
IPL

IPL 2024 : कोण असणार माहीचा उत्तराधिकारी? CSK नवीन कर्णधार निवडण्याच्या तयारीत, धोनी घेणार मोठा निर्णय

Who is Future CSK captain after MS Dhoni News : चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आयपीएलच्या आगामी हंगामासाठी तयारी करत आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह बहुतांश खेळाडू चेन्नईत सराव करत आहेत.

Kiran Mahanavar

CSK New Captain after MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आयपीएलच्या आगामी हंगामासाठी तयारी करत आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह बहुतांश खेळाडू चेन्नईत सराव करत आहेत. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गतविजेत्या सीएसकेचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. धोनीचा हा शेवटचा हंगाम असेल असे बोल्या जात आहे. अशा स्थितीत चेन्नईचा पुढचा कर्णधार कोण असेल याच्या चर्चेला उधाण आले आहे.

पण त्याआधी, आयपीएलच्या सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी सीएसकेचे सीईओ विश्वनाथन म्हणाले की, एन श्रीनिवासन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की एमएस धोनी आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग पुढील कर्णधार आणि उपकर्णधार निवडतील.

कासी विश्वनाथन यांच्या मते एन श्रीनिवासन यांना एमएस धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग यांनी चेन्नई संघाचा पुढचा कर्णधार ठरवावा अशी इच्छा आहे. म्हणजे एक प्रकारे धोनीचा पुढचा उत्तराधिकारी कोण असेल याची तयारी सुरू झाली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच आयपीएल जेतेपदे पटकावली आहेत.

त्यामुळे पण आता असे मानले जात आहे की धोनी त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आयपीएल 2024 हे त्याचे शेवटचे विजेतेपद असू शकते अशी अटकळ आहे. मात्र, या आयपीएलमध्ये माही पुन्हा एकदा चेन्नईची धुरा सांभाळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या या मोसमातील सलामीच्या सामन्यापूर्वीच तो चेन्नई कॅम्पमध्ये सामील झाला आहे. सलामीचा सामना 22 मार्चलाच खेळवला जाणार आहे.

धोनी गेल्या हंगामात गुडघ्याच्या दुखापतीने खेळला होता. दरम्यान, सीएसकेला जेतेपदावर जिंकून दिल्यानंतर त्याने आयपीएलचा पुढील हंगामात खेळण्याची पुष्टी केली होती. यानंतर चेन्नईच्या चाहत्यांसह इतर क्रिकेटप्रेमींनाही खूप आनंद झाला होता.

CSK सीईओ कासी विश्वनाथन यांनी त्यांच्या YouTube चॅनल 'क्रिक इट विथ बद्री' वर माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथसोबत धोनीच्या आगामी रोडमॅपबद्दल बोलले. ते म्हणाले, बघा, आमची अंतर्गत चर्चा झाली आहे, पण श्रीनिवासन यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे, सध्या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या नियुक्तीबद्दल बोलू नका. याबाबत प्रशिक्षक (स्टीफन फ्लेमिंग) आणि कर्णधार (धोनी) यांना निर्णय घेऊ द्या. ते निर्णय घेतील आणि मला सांगतील, मग मी तुम्हा सर्वांना सांगेन.

जडेजा 2022 मध्ये झाला होता CSK चा कर्णधार

चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 मध्ये त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते, परंतु त्याचा गेम उलटला. आणि धोनीला मधल्या हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT