MS Dhoni | CSK | IPL 2024  Sakal
IPL

MS Dhoni: धोनीने पंजाबविरुद्ध का केली 9 व्या क्रमांकावर फलंदाजी? खरं कारण आलं समोर

MS Dhoni Batting position: आयपीएलमध्ये धोनी शेवटच्या षटकांमध्येच फलंदाजीला का येत आहे, याबद्दलचे कारण समोर आले आहे.

Pranali Kodre

MS Dhoni Batting position: चेन्नई सुपर किंग्सने रविवारी (5 मे) आयपीएल 2024 स्पर्धेत धरमशाला येथे झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध 28 धावांनी विजय मिळवला.

पण याचा सामन्यानंतर चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनीवर 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यावरून मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता त्याच्या या निर्णयामागील कारण समोर आले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई संघाकडून धोनी 19 व्या षटकात 7 वी विकेट गेल्यानंतर 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. परंतु, त्याला पहिल्याच चेंडू खेळताना हर्षल पटेलने त्रिफळाचीत केले.

दरम्यान, या सामन्यानंतर त्याने चांगल्या फॉर्ममध्ये असूनही 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याबद्दल अनेकांनी टीका केली, ज्यात हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांचाही समावेश होता.

मात्र, आता समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार धोनीच्या पायाला दुखापत आहे. त्याचमुळे त्याच्या हालचालींवर बंधन येत आहे. त्याचमुळे धोनी शक्यतो शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला येत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नईच्या सुत्राने माहिती दिली आहे की धोनीच्या पायांमधील स्नायू ताणले गेले आहेत. त्यामुळे तो खूप वेळ पळू शकत नाही. त्याला ही दुखापत यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला झाली आहे.

पण संघाचा दुसरा यष्टीरक्षक डेवॉन कॉनवे देखील दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर झाला आहे, त्यामुळे दुसरा यष्टीरक्षक नसल्याने धोनीला खेळावे लागत आहे.

त्याचमुळे तो फलंदाजीला येण्यापूर्वी औषधे घेत आहे. तसेच धावणे जितके टाळता येईल, तितके टाळत आहे. त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितली आहे, परंतु, दुसरा यष्टीरक्षक नसल्याने त्याच्याकडे खेळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

त्याचबरोबर एका सुत्राने सांगितले की 'सध्या आमचा तसा बी संघ खेळत आहे. जे धोनीवर टीका करत आहेत, त्यांना माहित नाही की तो संघासाठी कोणता त्याग करत आहे.'

दरम्यान, गेल्या आयपीएल हंगामातही धोनी गुडघ्याची दुखापत असताना खेळला होता. त्याचे आयपीएल 2023 नंतर गुडघ्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर त्याचा गुडघा बरा झाला आहे, मात्र आता पायांच्या स्नायुंमध्ये ताण आला आहे.

याबरोबरच यंदाच्या हंगामापूर्वी धोनीने नेतृत्वाची धूराही ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली होती. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार ऋतुराज चांगले नेतृत्व करत असून त्याला धोनीचे मार्गदर्शन मिळत आहे. तसेच जरी यंदा चेन्नईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले नाही, तरी ऋतुराजला कर्णधारपदावरून काढण्यात येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT