Why Mumbai Indians took away captaincy from Rohit Sharma Marathi News sakal
IPL

IPL 2024 : रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सने का हिसकावले कर्णधारपद? कोचने केलं कारण स्पष्ट

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 ची तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेबद्दल चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्साह दिसत आहे. या टूर्नामेंट आणि मिनी लिलावापूर्वी, 5 वेळा चॅम्पियन फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची आणि हार्दिक पांड्याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केले. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बराच वाद झाला होता.

फ्रँचायझीच्या या निर्णयामुळे चाहते प्रचंड संतापले होते त्यांना जाणून घ्यायचे होते की त्यांनी असे का केले. यावर आता मुंबईचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी उत्तर दिले असून रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून हार्दिकला नवा कर्णधार बनवण्यात आले हे स्पष्ट केले आहे.

स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना मार्क बाउचर म्हणाला की, 'माझ्या मते हा क्रिकेटचा निर्णय होता. हार्दिकला खेळाडू म्हणून संघात परत आणण्यासाठी आम्हीला विंडो मिळाली. मुंबईसाठी हा बदलाचा काळ आहे. बहुतेक भारतीय चाहत्यांना हे समजत नाही आणि ते खूप भावूक होतात. पण या सगळ्यापासून भावनांना दूर ठेवावे लागते. हा फक्त क्रिकेटचा निर्णय होता. यामुळे रोहितमधील सर्वोत्तम कामगिरी समोर येईल. तो क्रीजवर जाऊन त्याच्या फलंदाजीचा आनंद घेईल आणि धावा काढेल.

मार्क बाउचरनेही हार्दिक पांड्याच्या कर्णधार कौशल्याचे कौतुक केले. तो म्हणाला की, ‘तो मुंबई इंडियन्सचा आहे. तो दुसऱ्या फ्रँचायझीकडे गेला जिथे त्याने पहिल्या वर्षीच विजेतेपद जिंकले आणि दुसऱ्या वर्षी उपविजेते ठरले. यावरून त्याच्याकडे अप्रतिम कर्णधार कौशल्य असल्याचे दिसून येते.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा पटकावले विजेतेपद

रोहित शर्माने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि त्याच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात त्याने संघाला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले. रोहितने गेल्या काही आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी संघर्ष करत होता. त्याने 2023 मध्ये 16 सामन्यांमध्ये 332 धावा केल्या, तर 2022 मध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 20 पेक्षा कमी सरासरीने केवळ 268 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT