Ind vs Aus WTC Final 2023 
IPL

IND vs AUS: WTC फायनलसाठी शेवटच्या क्षणी बदलला संघ! ICC ने दोन्ही संघांची केले घोषणा

फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे मात्र....

Kiran Mahanavar

Ind vs Aus WTC Final 2023 : भारतीय संघाला लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जून ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी रविवारी (28 मे) दोन्ही संघांनी आपला शेवटचा संघ आयसीसीकडे सोपवला आहे. टीम इंडियाने एकूण 18 खेळाडूंची नावे आयसीसीला दिली आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने 17 खेळाडूंची यादी सादर केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. मात्र भारतीय निवड समितीने आयसीसीकडे संघ सोपवण्यापूर्वी बदल केला. भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू ऋतुराज गायकवाडच्या जागी 21 वर्षीय यशस्वी जैस्वालला इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू मिचेल मार्श आणि फलंदाज मॅट रेनशॉ यांना मुख्य संघात स्थान दिलेले नाही. दोन्ही खेळाडू राखीव संघाशी जोडले गेले आहेत. या दोघांचा यापूर्वी निवड करण्यात आलेल्या 17 सदस्यीय संघात समावेश होता.

भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचला आहे. पण गेल्या वेळी टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी ऑस्ट्रेलियन संघ प्रथमच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे.

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कमही जाहीर केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला सुमारे 13 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर उपविजेत्याला 6.5 कोटी रुपये दिले जातील.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

  • स्टँडबाय खेळाडू: यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगल्स (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी , स्टीव्हन स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

  • स्टँडबाय खेळाडू: मिचेल मार्श, मॅट रेनशॉ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT