India vs Australia WTC Final 
IPL

WTC फायनलपूर्वी ICC ने टीम इंडियाला दिला दणका! 'या' चेंडूने खेळला जाणार सामना

फायनलमध्ये वापरल्या जाणार्‍या चेंडूबाबत मोठी बातमी

Kiran Mahanavar

India vs Australia WTC Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. 2013 नंतर भारतीय संघाला पहिली ICC ट्रॉफी मिळवायची आहे. दरम्यान फायनलमध्ये वापरल्या जाणार्‍या चेंडूबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

भारतात कसोटी सामने एसजी बॉलने खेळले जातात, तर ऑस्ट्रेलियात कुकाबुरा वापरला जातो. पण अंतिम सामना ड्यूक बॉलने होणार आहे. क्रिकेटची जागतिक संघटना असलेल्या आयसीसीनेही याचे कारण दिले आहे. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.

अंतिम सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे यजमान देशानुसार सामन्यात चेंडूचा वापर केला जाईल. इंग्लंडमधील कसोटी सामने ड्यूक चेंडूने खेळले जातात. आयसीसीच्या सूत्राने सांगितले की, आयसीसी सामन्यात यजमान देशाच्या मर्जीतील चेंडूचा वापर करते. त्यामुळे WTC फायनलमध्ये फक्त ड्यूक बॉल वापरला जाईल. याआधी 2021 मध्येही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये खेळवण्यात आला होता आणि तेव्हाही ड्यूक बॉलचा वापर करण्यात आला होता.

अलीकडेच भारतीय कर्णधार रोहित शर्माने ड्यूक बॉलच्या तयारीबाबत मोठी गोष्ट सांगितली होती. त्याने सांगितले की, आम्ही सर्व वेगवान गोलंदाजांना ड्यूक बॉल पाठवत आहोत जेणेकरून ते देखील यासह सराव करू शकतील. 21 मे पर्यंत आयपीएल 2023 च्या प्लेऑफसाठी 4 संघ ठरतील. अशा परिस्थितीत जे खेळाडू मोकळे असतील, त्यांना आधी इंग्लंडला पाठवले जाईल, जेणेकरून ते तिथे स्वत:ची तयारी करू शकतील. कसोटीसाठी निवडलेल्या संघाबद्दल बोलायचे झाले तर चेतेश्वर पुजारा अजूनही इंग्लंडमध्ये असून तो काउंटी क्रिकेट खेळत आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेजलवाड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिश, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More : ''शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी आमच्या अंगावर या''; वसंत मोरेंनी घेतला निशिकांत दुबेंचा समाचार...

Hindu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

SCROLL FOR NEXT