WTC Final 2023 Virat Kohli R Ashwin & Other Team India Members Set To Leave For UK Tomorrow captain 
IPL

WTC Final 2023 : विराट कोहलीसह 7 खेळाडू उद्या होणार लंडनला रवाना! कर्णधार रोहित शर्मा कधी जाणार?

Kiran Mahanavar

WTC Final 2023 Ind vs Aus : आयपीएल 2023 मध्ये 70 सामने संपले असून चेन्नई, लखनौ, गुजरात आणि मुंबई या चार संघांनी प्लेऑफमध्ये गेले आहेत. आता या हंगामाचा अंतिम सामना 28 मे रोजी आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे पुढील लक्ष्य जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलवर असणार आहे.

भारताला 7 जूनपासून ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा असून त्यासाठी भारतीय संघातील काही खेळाडू मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत.

मंगळवारी लंडनला रवाना होणार्‍या खेळाडूंमध्ये विराट कोहली, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि आर अश्विन यांचा समावेश आहे. आयपीएलमधील या खेळाडूंचा प्रवास आता संपला आहे.

दुसरीकडे रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचली आहे आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अंतिम सामन्याच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 मे रोजी लंडनला रवाना होऊ शकतो आणि उर्वरित संघ देखील त्याच्यासोबत जातील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियासोबत तीन नेट बॉलर्स जाणार असून त्यात अंकित चौधरी, आकाशदीप आणि यारा पृथ्वीराज यांचा समावेश आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

पहिल्या सत्रात भारताला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. त्यावेळी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हाती आले. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मागील चुकीची पुनरावृत्ती न करता चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर बीसीसीआय टीम इंडियाला सराव सामनाही खेळवण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Wari: टाळ-मृदंग, हरिनाम आणि रांगोळ्यांच्या पायघड्या; हडपसरमध्ये पालखी सोहळ्याला भक्तिमय स्वागत

Tanvi Khanna Exclusive: 'जानेवारीत जिच्याकडून हरले, तिलाच फायनलमध्ये हरवलं', शस्त्रक्रिया, बदलतं Squash अन् कमबॅकवर तन्वी झाली व्यक्त

Pune Ness: ना गटार स्वच्छ, ना जाळी दुरुस्त! पुण्यात महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका तुटलेल्या जाळीत पाय अडकून पादचारी जखमी

SCROLL FOR NEXT