India vs Australia WTC Final 
IPL

WTC Final 2023: मिशन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप! टीम इंडियाची पहिली तुकडी इंग्लंडला रवाना

आयपीएलमध्ये आव्हान संपुष्टात आलेल्या संघांतील खेळाडू पहाटे लंडनला रवाना

Kiran Mahanavar

India vs Australia WTC Final 2023 : आयपीएलमध्ये आव्हान संपुष्टात आलेल्या संघांतील विराट कोहली, मोहम्मद सिराजसह सात जण मंगळवारी पहाटे लंडनला रवाना होत आहेत. या खेळाडूंसाठी आता कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याचे मिशन आहे.

विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असलेल्या बंगळूर संघाचे आयपीएलमधील आव्हान रविवारी संपुष्टात आले. त्या अगोदर राजस्थान, दिल्ली आणि कोलकता यांनाही प्ले-ऑफ न गाठता आल्यामुळे आर. अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर यांच्यासह आयपीएलमधून अगोदर दुखापतीमुळे बाहेर गेलेले उमेश यादव व जयदेव उनाडकट हे सुद्धा आज एकाच विमानातून लंडनला जाणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह सपोर्ट स्टाफही असणार आहे. उमेश आणि उनाडकट तंदुरुस्त झाल्याची माहिती मिळत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान ओव्हल मैदानावर होत आहे. पहिल्या टप्प्यात आज सात खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ रवाना झाल्यानंतर आणि दोन टप्प्यात उर्वरित खेळाडू लंडनला जातील, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, इशान किशन, शुभमन गिल, मोहम्मद शमी, के. एस. भारत आणि अजिंक्य रहाणे या सात खेळाडूंचे संघ प्लेऑफमध्ये असल्याने ते सध्या भारतात असतील. चेतेश्वर पुजारा इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळत असल्यामुळे तो अगोदरच लंडनमध्ये आहे.

भारताला सराव सामना नाही

  • इंग्लिश कौंटी स्पर्धेचा मोसम सुरू असल्यामुळे भारताला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी सराव सामना मिळणार नाही, तसेच ही आयसीसीची स्पर्धा असल्यामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळालाही सराव सामन्यासाठी पुढाकार घेणे बंधनकारक नाही.

  • अशा परिस्थितीतही कौंटी संघांनी जरी खेळण्याची तयारी दर्शवली तरी तो संघ दुय्यम श्रेणीचा असेल. कोणताही कौंटी संघ अव्वल खेळाडूंना या सामन्यात खेळण्याची परवानगी देणार नाही, त्यामुळे कमकवुत संघाबरोबर खेळून आवश्यक असलेला सराव आपल्या संघाला मिळणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

  • चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता भारतीय संघातील सर्व खेळाडू आयपीएलमध्ये खेळून कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार आहेत, तर ऑस्ट्रेलिया संघातील केवळ तीनच खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अधिक तयारीचे असतील, असे भाष्य रिकी पाँटिंग यांनी गेल्याच आढवड्यात केले होते.

  • पाँटिंग यांनी अर्थातच त्यांच्या ऑस्ट्रेलियाच्या बाजूने भाष्य केले असले तरी दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे. विराट कोहलीने आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी करत फॉर्म मिळवला आहे. त्याचा फायदा कसोटी अंतिम सामन्यात निश्चितच होऊ शकेल, त्याच वेळी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मात्र क्रिकेटपासून दूर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT