Yash Dayal | IPL 2024 Sakal
IPL

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

Yash Dayal: चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासह प्लेऑफचं तिकीट मिळवून देण्यात यश दयालने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात त्याने टाकलेल्या शेवटच्या षटकावेळी काय भावना होत्या, याबद्दल त्याच्या वडिलांनी खुलासा केला.

Pranali Kodre

Yash Dayal: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सला 27 धावांनी पराभूत करत प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले. बंगळुरूला हा विजय मिळवून देण्यात वेगवान गोलंदाज यश दयालने मोलाचा वाटा उचलला.

अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 35 धावांची आणि प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी १७ धावांची गरज होती. यावेळी एमएस धोनी आणि रविंद्र जडेजा फलंदाजी फलंदाजी करत होते, तर दयाल गोलंदाजी करत होता.

त्याच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने मोठा षटकार मारला. पण पुढच्याच चेंडूवर त्याने धोनीला बाद केलं आणि नंतरच्या चार चेंडूत एकच धाव दिली. त्यामुळे बंगळुरूने विजयासह प्लेऑफचं तिकीटही पक्कं केलं.

दरम्यान, याच दयालसाठी आयपीएल 2023 हंगाम मात्र विसरण्यासारखा ठरला होता. 9 एप्रिल 2023 रोजी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकु सिंगने त्याच्या गोलंदाजीवर सलग 5 षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर यश दयालचा संघर्ष पाहून त्याची आईही आजारी पडली होती.

मात्र, या घटनेनंतर यश दयालनेही मोठी मेहनत घेत चांगले पुनरागमन केले. त्याला आयपीएल 2024 लिलावात बंगळुरूने 5 कोटींची किंमत मोजत संघात घेतले. बंगळुरूने दाखवलेला विश्वास यश दयालनेही सार्थ ठरवला.

दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दयालने चेन्नईविरुद्धच्या सामन्यानंतर आईला फोन करत आधी विचारले की 'तुला आता कसं वाटत आहे?'

तसेच या सामन्यानंतर दयाल कुटुंबातही मोठा जल्लोष साजरा झाला. यश दयालचे वडील चंद्रपाल यांनी क्लब क्रिकेट खेळले आहे. त्यांनी चेन्नईविरुद्धच्या सामन्यावेळी शेवटच्या क्षणी कशा भावना होत्या, हे देखील सांगितले.

त्यांनी सांगितले की जेव्हा धोनीने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, तेव्हा गेल्यावर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. पण तरीही विश्वास होता की यावेळी निकाल वेगळा लागेल. तसेच त्यांनी सांगितले की त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे.

दरम्यान, दयालविरुद्ध 5 सलग षटकार मारणाऱ्या रिंकु सिंगनेही ही ईश्वराची योजना असल्याची प्रतिक्रिया दिली. यश दयालने आयपीएल 2024 मध्ये 13 सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT